Prestige Group: प्रेस्टीज ग्रुप गोव्यात सुरु करणार भव्य मॉल, कंपनी जागेच्या शोधात

प्रेस्टीज ग्रुपचे सध्या बेंगळुरू आणि कोचीमध्ये चार मॉल असून, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये आणखी आठ मॉल्स विकसित करण्याची त्यांची योजना आहे.
Prestige Group Mall:
Prestige Group Mall: Dainik
Published on
Updated on

Prestige Group: भारतातील एक प्रसिद्ध मालमत्ता विकासक प्रेस्टीज ग्रुप गोवा आणि मुंबईमध्ये मॉल्स उभारण्यासाठी जमिनीच्या शोधात आहे. कोरोनानंतर रिटेलमध्ये वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी कंपनी सध्या जमिनीच्या शोधात आहे.

प्रेस्टीज ग्रुपचे सध्या बेंगळुरू आणि कोचीमध्ये चार मॉल असून, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये आणखी आठ मॉल्स विकसित करण्याची त्यांची योजना आहे.

कंपनीने यापूर्वी नेक्सस मॉल्सला त्याच्या किरकोळ व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग विकला आहे. पण, प्रेस्टिज ग्रुपने मॉल पोर्टफोलिओचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गोवा आणि मुंबईतील मॉल्स सुरु करण्याची कंपनीची नजीकच्या काळात योजना आहे.

तसेच, कंपनी दिल्ली-एनसीआर प्रदेशात विस्तारासाठी जमीन शोधत आहे. एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध होतील या उद्देशाने मॉल्स विकसित करण्यावर कंपनीचा भर आहे. 3-4 वर्षात 13 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र विकसित करण्याचे कंपनीच्या विस्तार योजनांचे उद्दिष्ट आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने अलीकडेच या महिन्यात भारतातील सर्वात मोठे लक्झरी शॉपिंग स्थळ, Jio World Plaza उघडले आहे. हे प्रेस्टीज ग्रुप सारख्या विकासकांना मॉल्सची वाढती मागणी पूर्ण करण्याची संधी देते.

प्रेस्टीज ग्रुपचा कोचीमध्ये नुकत्याच उघडलेला मॉल उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्यामुळे कंपनीचा विस्तार आणि वाढती मागणी यांचा विचार करता ग्रुप सध्या मुंबई आणि गोव्यात जागेच्या शोधात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com