Pradhan Mantri Matru Vandana Yojana: शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी मोदी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. पीएम किसान अंतर्गत, सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते.
तसेच, शासनाकडून विवाहित महिलांसाठीही ही योजना राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून देशातील महिलांसाठी अनेक विशेष योजना राबवण्यात येत आहेत.
दरम्यान, मोदी सरकारने गर्भवती महिलांसाठी (Women) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. यामध्ये सरकार गरोदर महिलेला पूर्ण 5000 रुपये देते. या शासकीय योजनेत गरोदर महिलांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.
देशभरात जन्माला येणारी मुले कुपोषित राहू नयेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नयेत यासाठी या योजनेतर्गंत महिलांना पैसे दिले जातात. हे लक्षात घेऊन ही योजना सुरु करण्यात आली आहे.
- गर्भवती महिलांचे वय किमान 19 वर्षे असावे.
-या योजनेत तुम्हाला फक्त ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
- सरकार 5000 रुपयांची रक्कम 3 हप्त्यांमध्ये हस्तांतरित करते.
-ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरु झाली.
लाभार्थी महिलेला योजनेचे पैसे तीन हप्त्यात मिळतात. पहिला हप्ता रु. 1000, दुसरा हप्ता रु 2000 आणि तिसरा हप्ता रु 2000 उपलब्ध आहे. हे पैसे थेट गर्भवती महिलांच्या बँक (Bank) खात्यात जमा केले जातात.
तुम्ही अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana वर देखील संपर्क साधू शकता. येथे तुम्हाला या योजनेची सर्व माहिती मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.