Budget 2023: 'जे बोललो तेच केले...,' नव्या अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारने हे काय सांगितले

Budget 2023: काही आठवड्यांनंतर सरकारकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

Budget 2023: काही आठवड्यांनंतर सरकारकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. नवीन अर्थसंकल्प सादर करण्याची तयारीही जोरात सुरु आहे. दरम्यान, 2022 च्या अर्थसंकल्पात त्यांनी केलेल्या घोषणाही पूर्ण झाल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. याच क्रमाने आता सरकारने एक महत्त्वाचा खुलासा केला असून 2022 च्या अर्थसंकल्पात त्यांनी केलेल्या घोषणांमध्ये काय प्रगती झाली हे सांगण्यात आले आहे.

बजेट

भारत सरकारकडून स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान, 2022-23 च्या अर्थसंकल्पात भारत सरकारकडून स्टार्ट-अप्सच्या समावेशाचा कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला होता. त्याचबरोबर सरकारकडून (Government) नवीन अर्थसंकल्पापूर्वी (Budget) यात किती प्रगती झाली हे सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने एक ट्विटही केले आहे.

PM Narendra Modi
Budget 2023: 1950 मध्ये Income Tax किती होता, स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे 'हे' डॉक्युमेंट व्हायरल!

सामान्य बजेट

MyGovHindi द्वारे ट्विट करुन माहिती देण्यात आली आहे. स्टार्ट-अप्सबाबत सरकारकडून आतापर्यंत झालेल्या प्रगतीबाबत, असे सांगण्यात आले की, पात्र स्टार्ट-अप्सच्या समावेशाचा कालावधी आणखी एका वर्षासाठी म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासोबतच एक फोटोही पोस्ट केला आहे. 'जे बोलले होते ते केले' असे या फोटोत लिहिले आहे.

PM Narendra Modi
Budget 2023: अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका? 'या' वस्तूंच्या किमतीत होऊ शकते मोठी वाढ

केंद्रीय अर्थसंकल्प

त्याचवेळी, सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की, पात्र स्टार्ट-अपच्या समावेशाचा कालावधी एक वर्षाने 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जेणेकरुन त्यांना निर्दिष्ट अटींनुसार कर सवलतीसाठी पात्र बनवता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com