Budget 2023: अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका? 'या' वस्तूंच्या किमतीत होऊ शकते मोठी वाढ

Budget 2023: 2023 वर्ष सुरु झाले असून नवीन वर्षात काही बदल होऊ शकतात. या बदलांमध्ये काही वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात.
Vastu Tips For Money
Vastu Tips For Money Dainik Gomantak
Published on
Updated on

Budget 2023: 2023 वर्ष सुरु झाले असून नवीन वर्षात काही बदल होऊ शकतात. या बदलांमध्ये काही वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. त्याचवेळी 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वास्तविक, 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वीच, BEE स्टार रेटिंगचे सुधारित नियम लागू झाले आहेत. त्यानंतर रेफ्रिजरेटरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

फ्रीज

ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी म्हणजेच बीईईने उपकरणांना दिलेले 'स्टार रेटिंग'चे सुधारित नियम 1 जानेवारीपासून लागू झाले आहेत. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे रेफ्रिजरेटरच्या किमती पाच टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. गोदरेज अप्लायन्सेस, हायर आणि पॅनासोनिक सारख्या उत्पादकांचे म्हणणे आहे की, नवीन नियमांमुळे ग्राहकांना (Customer) मॉडेलनुसार दोन ते पाच टक्के अतिरिक्त भार सहन करावा लागू शकतो.

Vastu Tips For Money
Budget 2023 Expectations: नोकरदारांसाठी मोठी खूशखबर! आता एवढ्या लाखापर्यंत भरावा लागणार आयकर

फ्रीज किंमत

BEE द्वारे उपकरणांच्या कार्यक्षमतेच्या आधारे स्टार रेटिंग दिले जाते. उपकरणांवर एक ते पाच क्रमांक असलेले हे स्टार संबंधित उत्पादन वीज वापराच्या बाबतीत किती कार्यक्षम आहे हे दर्शवतात. याशिवाय लेबलिंग प्रक्रियाही कडक करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार फ्रॉस्ट फ्री मॉडेल्समध्ये फ्रीजर आणि रेफ्रिजरेटर प्रोव्हिजनिंग युनिट्स (स्टोरेज पार्ट्स) साठी वेगळे 'स्टार लेबलिंग' अनिवार्य करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com