PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak

Indian Railways: मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, रेल्वेच्या विकासासाठी 32,500 कोटी मंजूर!

Modi Government: आता देशातील रेल्वे विकासाला आणखी वेग येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी 7 मोठे प्रकल्प मंजूर केले आहेत.

Modi Government: आता देशातील रेल्वे विकासाला आणखी वेग येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी 7 मोठे प्रकल्प मंजूर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पांचे काम सुरु झाल्यानंतर भारतीय रेल्वेच्या सुविधा पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या होतील, असा विश्वास केंद्र सरकारला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पांतर्गत देशात अनेक ठिकाणी नवीन रेल्वे मार्गही सुरु करण्यात येणार आहेत.

यासोबतच रेल्वे मार्गाचेही अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने 32,500 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित केला आहे.

दरम्यान, यापैकी 4195 कोटी रुपये खर्चून देशभरातील 508 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या स्थानकांवर प्रवाशांना सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा पुरवल्या जातील.

विशेष म्हणजे, रेल्वेच्या विकासासाठी ही सर्व कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केली जाणार आहेत.

यासोबतच हरियाणामध्ये (Haryana) 16 रेल्वे स्थानकांचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 608 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

PM Narendra Modi
Indian Railway Rules: तुम्हीही ट्रेनमध्ये धुम्रपान करता का? रेल्वेचा 'हा' नियम जाणून बसेल मोठा धक्का

अशा प्रकारे स्थानकांचा विकास केला जाईल

हरियाणातील सर्व स्थानकांचा विकास राज्याच्या संस्कृती आणि वारशाच्या आधारे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच हरियाणाच्या कलाकृतींशी संबंधित चित्रेही स्थानकांच्या भिंतींवर कोरली जाणार आहेत.

जेणेकरुन इतर राज्यांतील प्रवाशांना हरियाणाची संस्कृती जवळून कळू शकेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या राज्यांमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी रेल्वेचे बहुतांश प्रकल्प मंजूर झाले आहेत.

PM Narendra Modi
Indian Railways: मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता रेल्वेतील हिस्सेदारी विकणार!

स्लीपर गाड्या तयार असतील

त्याचवेळी, भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील आणू शकते. त्यासाठी त्याची तयारी सुरु आहे. पुढील वर्षी वंदे भारत स्लीपर गाड्यांची पहिली खेप येईल.

तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सांगितले होते की, चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत ट्रेनसाठी स्लीपर बोगी तयार केल्या जातील.

त्यानंतर डिसेंबरपासून कारखान्यात स्लीपर कोचची निर्मिती सुरु होईल, असे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे, पुढील वर्षी मार्चपर्यंत काही स्लीपर ट्रेन तयार होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com