Indian Railway Rules: तुम्हीही ट्रेनमध्ये धुम्रपान करता का? रेल्वेचा 'हा' नियम जाणून बसेल मोठा धक्का

Indian Railway Rules: सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. सरकारही वेळोवेळी याबाबत सांगत असते.
Indian Railways
Indian Railways Dainik Gomantak

Indian Railway Rules: सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. सरकारही वेळोवेळी याबाबत सांगत असते. परंतु जर तुम्ही ट्रेनमध्ये धुम्रपान केले तर...? याचा कधी विचार केला आहे का?

जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, रेल्वेने धूम्रपानाबाबत कोणते नियम बनवले आहेत.

नुकतेच वंदे भारत ट्रेनमध्ये एका प्रवाशाने सिगारेट पेटवल्याचे दिसले आणि त्यानंतर स्मोकिंग सेन्सर चालू झाले, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे रेल्वेचा हा नियम तुम्हालाही माहीत असणे महत्त्वाचे आहे.

काय आहे रेल्वेचा नियम?

रेल्वे कायद्याच्या कलम 167 नुसार ट्रेनमध्ये धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. यासोबतच सहप्रवाशांनी नकार दिल्यानंतरही प्रवासादरम्यान कोणी प्रवासी सिगारेट ओढत असेल तर त्याला रेल्वेकडून दंडही होऊ शकतो.

Indian Railways
Indian Railways: मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता रेल्वेतील हिस्सेदारी विकणार!

500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो

रेल्वेकडून 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. ट्रेनमध्ये सिगारेट ओढण्यास मनाई आहे. रेल्वेत असे प्रकार केल्याने आग लागू शकते आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही (Passengers) त्रास सहन करावा लागू शकतो, असे रेल्वेने म्हटले आहे.

ट्रेनमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहेत

रेल्वेने सांगितले की, ट्रेनमध्ये आग लागण्यासारख्या घटना टाळण्यासाठी सेन्सर बसवले जातात. 2500 हून अधिक डब्यांमध्ये अशी यंत्रणा बसवण्यात आली आहे, जेणेकरुन ट्रेनमध्ये कोणी आग लावली तर त्याची माहिती मिळेल.

आपण ट्रेनमध्ये हुक्का पिऊ शकतो का?

रेल्वे कायद्याच्या कलम 164 नुसार ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची ज्वलनशील सामग्री घेऊन जाणे हा दंडनीय गुन्हा आहे. जर कोणत्याही प्रवाशाने रेल्वेच्या या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

Indian Railways
Indian Railway: रेल्वेकडून सर्वसामान्यांना खूशखबर, आता धावणार अशी ट्रेन...

शौचालयातही धुम्रपान करता येत नाही

याशिवाय अनेक प्रवाशांना असे वाटते की, ते टॉयलेटमध्ये सिगारेट ओढू शकतात, पण तसे नाही. तुम्ही ट्रेनमध्ये कुठेही धूम्रपान करु शकत नाही. जळत्या माचीसची काडी ट्रेनमध्ये (Train) किंवा परिसरात कुठेही फेकल्यास आग लागण्याची दाट शक्यता असून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com