Google Pixel Fold व्हिडिओ लीक, लाँच होण्यापुर्वीच पाहा फोनचे डिझाईन

गुगलचा फोल्डेबल फोन लाँच होण्यापुर्वीच एक छोटी क्लिप इंटरनेटवर लीक झाली आहे.
Google Pixel Fold
Google Pixel FoldDainik Gomantak
Published on
Updated on

Google Pixel Fold Leaked: हळूहळू फोल्डेबल स्मार्टफोन्सची बाजारपेठ वाढत आहे. टेक कंपन्याही या दिशेने मोठी प्रगती करत आहेत.

आत्तापर्यंत Samsung, Vivo, Oppo, Techno इत्यादी अनेक कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन बाजारात लाँच केले आहेत. 

आता टेक जॉइंट गुगलही या शर्यतीत सहभागी होणार आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की कंपनी आपल्या आगामी I/O इव्हेंटमध्ये आपला पहिला फोल्डेबल पिक्सेल स्मार्टफोन लाँच करू शकते.पण  लाँच होण्यापूर्वी या स्मार्टफोनची एक छोटी क्लिप इंटरनेटवर लीक झाली आहे. 

  • गुगलचा पहिला फोल्डेबल फोन असा दिसतो

कंपनीचा I/O कार्यक्रम 10 मे रोजी लाँच होणार आहे. Google या कार्यक्रमात Android 14 देखील सादर करणार आहे. Kuba Wojciechowski नावाच्या टिपस्टरने ट्विटरवर Google Pixel Fold चा 6 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडिओनुसार फोनच्या मुख्य स्क्रीनवर फ्रंट कॅमेरा असेल. स्मार्टफोनचे अंतर्गत बेझल्स जाड दिसतात. याशिवाय, तुम्हाला फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर की मिळतील.

व्हिडिओमध्ये कोणताही Google लोगो दिसत नाही. टिपस्टरने टिप्पणी विभागात निश्चितपणे पुष्टी केली आहे की तो Google पिक्सेल फोल्ड आहे.

Google Pixel Fold ला 5.8 इंच सबस्क्रीन आणि 7.6 इंची मुख्य स्क्रीन मिळू शकते. हा स्मार्टफोन Google Tensor G2 प्रोसेसरसह येऊ शकतो. स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

ज्यामध्ये 12/256GB ची किंमत जवळपास $1,799 (1.47 लाख) आणि 12/512GB ची किंमत $1,919 (1.57 लाख) असू शकते. तुम्ही बेस व्हेरिएंट चॉक आणि ऑब्सिडियन कलरमध्ये खरेदी करू शकाल तर टॉप एंड व्हेरियंट फक्त ऑब्सिडियन कलरपुरता मर्यादित असू शकतो.लीकनुसार, मोबाईल फोनसाठी प्री-ऑर्डर 10 मे पासून सुरू होतील तर त्यांची शिपिंग 27 जूनपासून सुरू होईल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com