Mobile Calling New Rule: 1 मे पासून लागू होणार नवा नियम! बनावट Calls आणि SMS पासून यूजर्सची होणार सुटका

New Rule: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Mobile Calling New Rule
Mobile Calling New RuleDainik Gomantak
Published on
Updated on

Mobile Calling New Rule: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमांनुसार, TRAI एक फिल्टर सेट करत आहे, जे 1 मे 2023 पासून फोनमधील बनावट कॉल आणि एसएमएस थांबवेल. यानंतर यूजर्स अनोळखी कॉल्स आणि मेसेजपासून मुक्त होतील. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

1 मे पासून लागू होणार नवा नियम

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या फोन कॉल आणि संदेश सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर स्थापित करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

हे फिल्टर फेक कॉल्स आणि मेसेजपासून यूजर्सचे संरक्षण करण्यात मदत करेल. या नवीन नियमानुसार, फोन कॉल्स आणि मेसेजशी संबंधित सर्व टेलिकॉम कंपन्यांना 1 मे 2023 पूर्वी फिल्टर स्थापित करावे लागतील.

Mobile Calling New Rule
Reliance Jio New Announcement: जिओच्या मनोरंजन विश्वासाठी धमाकेदार घोषणा...युजर्सना नेमकं काय मिळणार?

जिओमध्ये ही सुविधा लवकरच सुरु होणार आहे

या संदर्भात एअरटेलने अशा AI फिल्टरची सुविधा आधीच जाहीर केली आहे. तर Jio ने देखील या नवीन नियमानुसार आपल्या सेवांमध्ये AI फिल्टर्स बसवण्याची तयारी दर्शवली केली आहे.

सध्या याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही, पण 1 मे 2023 पासून भारतात AI फिल्टर्सचे अॅप्लिकेशन सुरु होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Mobile Calling New Rule
IPL 2023: Jio Cinema ने केला मोठा रेकॉर्ड, पहिल्या वीकेंडमध्ये 147 कोटी व्ह्यूज...

प्रमोशन कॉल्सवर बंदी घातली जाईल

ट्राय फेक कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत TRAI ने 10 अंकी मोबाईल नंबरवर केले जाणारे प्रमोशनल कॉल थांबवण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, TRAI ने कॉलर आयडी फीचर देखील आणले आहे, जे कॉलरचे नाव आणि फोटो प्रदर्शित करेल.

दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio देखील Truecaller अॅपशी बोलणी करत आहेत, परंतु ते कॉलर आयडी फीचर लागू करण्यापासून परावृत्त करत आहेत कारण यामुळे गोपनीयतेची समस्या उद्भवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com