OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

OpenAI थेट Google ला टक्कर देण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनी लवकरच सर्च इंजिन लॉन्च करु शकते.
OpenAI  ChatGPT.
OpenAI ChatGPT.Dainik Gomantak

OpenAI आता ChatGPT नंतर एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. OpenAI थेट Google ला टक्कर देण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनी लवकरच सर्च इंजिन लॉन्च करु शकते. जिमी ऍपल्सने हा दावा केला आहे. कंपनी एक मोठ्या इव्हेंटचं प्लॅनिंग करत आहे, जो 9 मे रोजी होऊ शकतो. ओपनएआयने काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटसाठी टीम हायर करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर असा अंदाज लावला जात आहे. जिमी ऍपल्स म्हणाले की, 'ते जानेवारीपासून इन-हाऊस इव्हेंट स्टाफ आणि इव्हेंट मार्केटिंगसाठी हायरिंग करत आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी इव्हेंट मॅनेजरला हायर केले.'

कंपनी एक मोठा प्रोजेक्ट सुरु करण्यावर काम करतेय

दरम्यान, हे सर्व लक्षात घेऊन ओपनएआय लवकरच एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन करु शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपला पुढील मोठा प्रोजेक्ट लॉन्च करु शकते. याशिवाय, एप्रिलपासून OpenAI मध्ये सुरु असलेल्या एक्टिविटीज देखील या रिपोर्टमध्ये शेयर केल्या आहेत.

OpenAI  ChatGPT.
OpenAI च्या ChatGPT मध्ये यूजरची चॅट होणार नाही लिक, लाँच होणार 'हे' प्रायव्हसी फीचर

जिमी यांनी सांगितले की, 'ओपनएआयने एप्रिलमध्ये 50 हून अधिक सब-डोमेन तयार केले आहेत.' रिपोर्ट्सनुसार, जर हे अनुमान खरे मानले गेले तर OpenAI स्वतःचे सर्च इंजिन लॉन्च करु शकते. या महिन्यात गुगलचाही मोठा इव्हेंट आहे. कंपनी 14 मे रोजी Google I/O चे आयोजन करत आहे. दरम्यान, ओपनएआय आपल्या इव्हेंटमध्ये पर्प्लेक्सिटी एआयशी स्पर्धा करण्यासाठी काहीतरी घोषणा देखील करु शकते. अलीकडेच, मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना हे एआय वापरण्यापासून रोखले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी त्यावर बंदी घातली आहे.

OpenAI  ChatGPT.
Android यूजर्सना सरकारचा इशारा, Google आणि इतर स्मार्टफोन कंपन्यांनी शोधले बग्स

सॅम ऑल्टमन यांनी इशारा दिला होता

यापूर्वी, ओपनएआयच्या सर्च इंजिनची माहिती काही रिपोर्ट्समध्ये आली होती. असा दावा केला जात आहे की, कंपनी एक सर्च प्रॉडक्ट बनवत आहे, जे गुगलला टक्कर देईल. हे सर्च Bing च्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा घेऊ शकते. अलीकडेच सॅम ऑल्टमन यांनी लेक्स फ्रिडमॅनच्या पॉडकास्टमध्येही याचे संकेत दिले होते.

मात्र, गुगल सर्चसारखे प्रोडक्ट थेट तयार करायचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'मला सध्याचे मॉडेल बोरिंग वाटते. प्रश्न फक्त अधिक चांगले 'गुगल सर्च' बनवण्याचा नाही. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर अधिक मजबूत करण्याचा आहे. मायक्रोसॉफ्ट बऱ्याच काळापासून गुगलशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अद्याप त्यांना बिंगच्या माध्यमातून ते यश मिळालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com