Sonali Phogat Murder: संशयित एडवीन नुनीस याच्यासह साथीदारांना पाच दिवस पोलीस कोठडी

सोनाली फोगट खून प्रकरण तपासाने घेतला वेग
Sonali Phogat death case
Sonali Phogat death caseDainik Gomantak

गेले काही दिवस भाजपनेत्या सोनाली फोगट खुन प्रकरणाने गोव्याचे वातावरण चांगलेच ढवळले आहे. सोनाली फोगट हिच्या मृत्यू प्रकरणी हवजूण पोलिसांनी अटक केलेल्या कर्लीसचे मालक एडविन नुनीस, ड्रग्स पुरवठा करणारा दत्तप्रसाद गावकर व रामा मांद्रेकर या तिघांना न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(in Sonali Phogat's death case owner of Curly's, club, drug supplier and the room boy Remanded for five days)

Sonali Phogat death case
Goa Congress: काँग्रेसच्यावतीने फोंड्यात महागाईविरोधात निदर्शने

या प्रकरणामूळे राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप - प्रत्योरापच्या फैरी सुरु केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी कार्यालयातून अशा प्रकरणावर भाष्यं करु नये अशा प्रकारचे आरोप गोवा फॉरवर्ड पार्टीकडून झाले. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या गुन्ह्यातील प्रत्येक गुन्हेगाराला निश्चित शिक्षा होईल असे ही म्हटले आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित तसेच फोगट यांच्यासोबत असणाऱ्या सुधीर सांगवान व सुखविंदर पाल सिंग या दोघांनी फोगाट यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. असे असले तरी या गुन्ह्यात ज्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशा गुन्हेगारांची धरपकड पोलीसांनी सुरुच ठेवली आहे. यामूळे गुन्ह्याशी निगडित कर्लिसचा मालक तसेच पेडलर रामदास मांद्रेकर व दत्तप्रसाद गावकर यांना न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.

Sonali Phogat death case
Vishwajeet Rane: करंझोळवासीयांविरुद्धचे खटले लवकर रद्द करावेत; विश्वजीत राणे

संशयित दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी

सोनाली फोगट खून प्रकरणातील संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर पाल सिंग यांना 27 ऑगस्ट रोजी 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीसांनी या प्रकरणातील सर्व शक्यता पडताळून पाहात गुन्ह्यात सामिल असलेल्या प्रत्येक आरोपीला जेरबंद करण्यासाठी आम्ही कसून प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात मुख्य घडमोडी ज्या ठिकाणी घडल्या तो कर्लीस क्लब आता बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांची हत्या, आणि त्यानंतर ड्रग्स प्याडलर दत्त प्रसाद आणि संबंधित कर्लीस बार मालकाला काल अटक झाली होती. त्यांना आज न्यायलयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठ़ीडी सुनावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com