Upcoming Electric Cars: 'या' देशी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार होणार लॉन्च , जाणून घ्या काय असेल वैशिष्ट्य

मारुती सुझुकी लवकरच मारुती फ्युचुरो-ई सादर करणार असून ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक कार असणार आहे.
Upcoming Electric Cars
Upcoming Electric CarsDainik Gomantak
Published on
Updated on

देशात इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड सातत्याने वाढत आहे. हे पाहता कार कंपन्यांचे संपूर्ण लक्ष या सेगमेंटकडे आहे. हे पाहता भारतात लवकरच अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहेत. यामध्ये सर्वात आधी टाटा टियागोचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केले जाईल. त्यानंतर महिंद्राची XUV400 देखील येत्या काही महिन्यांत लॉन्च होणार आहे. या कारला अनेक फीचर्ससह उत्तम रेंज मिळेल. त्यामुळे तुम्हीही लवकरच नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर थोडी प्रतीक्षा करा, कारण येत्या काही महिन्यांत एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. Tata आणि Mahindra सोबत, Hyundai Motor देखील लवकरच आपल्या अनेक नवीन इलेक्ट्रिक कार देशात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

टाटा आणि महिंद्राच्या या आगामी इलेक्ट्रिक कार

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारच्या (Electric Cars) विभागात टाटा मोटर्सची मजबूत पकड आहे. कंपनी लवकरच टियागो ईव्हीचा समावेश करेल. देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असण्यासोबतच ती मोठ्या रेंजसह येणार आहे. Tiago EV लाँच केल्यानंतर, टाटा आपली हॅचबॅक अल्ट्रोझ आणि मिनी एसयूव्ही पंच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही लॉन्च करू शकते. या सेगमेंटमध्ये, ही भारतीय कंपनी महिंद्रा लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 लॉन्च करणार आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने या कारचे अनावरण केले होते. यासोबतच कंपनी आपले सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मॉडेल KUV 100 लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

टाटा आणि महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारशी टक्कर देण्यासाठी Hyundai Motors आपली दुसरी इलेक्ट्रिक कार Ioniq 5 भारतात (India) लॉन्च करणार आहे. तसेच, लवकरच कंपनी कोना इलेक्ट्रिक कारचे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनूसार मारुती सुझुकी लवकरच मारुती फ्युचुरो-ई सादर करू शकते. ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक कार असणार आहे. एकंदरीत, येत्या काही दिवसांत नवीन इलेक्ट्रिक कारचे अनेक मॉडेल्स बाजारात पाहायला मिळणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com