Flight Ticket Discount: केवळ 2093 रुपयांत करा विमानप्रवास; इंडिगोतर्फे आकर्षक ऑफर्स

देशांतर्गत फ्लाईट्सवर विशेष तिकिट सवलत सुरू
Indigo Flight
Indigo FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Flight Ticket Discount Offer: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने देशांतर्गत फ्लाइटच्या प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. फक्त 2093 रुपयांमध्ये आता विमान प्रवास करता येणार आहे.

तथापि, ही ऑफर 13 मार्च 2023 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आहे. या ऑफरवर प्रवासासाठी तुम्ही 25 फेब्रुवारीपर्यंत बुकिंग करू शकता.

Indigo Flight
Vrindavan Chandrodya Temple: 'बुर्ज खलिफा'लाही मागे टाकणार भारतातील 'हे' मंदिर

आपल्या ट्विटर हँडल आणि वेबसाइटवर याबद्दल माहिती देताना, इंडिगो एअरलाइन्सने म्हटले आहे की, देशांतर्गत उड्डाणांचा प्रवास 2093 रुपयांपासून सुरू होतो. सर्व फ्लाइटसाठी वेगवेगळे दर आहेत. इंडिगोकडे 300 विमाने आहेत.

एअरलाइन्सची दररोज सुमारे 1800 उड्डाणे होतात. ज्यात 78 देशांतर्गत आणि 26 आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे.

ऑफर फक्त अशा फ्लाइटसाठी

इंडिगोने सांगितले की, ही ऑफर मर्यादित आहे. या अंतर्गत देण्यात आलेल्या सूटमध्ये विमानतळ आणि सरकारी कराचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजे तुम्हाला फक्त तिकिटावर सवलत दिली जात आहे. इतर वस्तूंवर शुल्क भरावे लागेल.

एअरलाइन्सने म्हटले आहे की ही ऑफर केवळ एकाहून अधिक क्षेत्रांवरील नॉन-स्टॉप देशांतर्गत उड्डाणांसाठी वैध आहे आणि इतर कोणत्याही ऑफरसह ती एकत्रित केली जाऊ शकत नाही.

Indigo Flight
Raipur NewlyWeds Death: लग्नाच्या रिसेप्शनदिवशी पत्नीची धारदार शस्त्राने हत्या, पतीचाही मृत्यू

बुकिंग कसे करायचे?

या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला एअरलाइन्सच्या वेबसाइटवर जावे लागेल आणि तुम्ही 13 मार्च 2023 आणि 13 ऑक्टोबर 2023 या काळातील प्रवास बुक करू शकता. वेबसाइटवर नाव, प्रवासाची तारीख आणि इतर माहिती भरून आणि ऑनलाइन पेमेंट करून बुकिंग करता येते.

या ठिकाणी नवीन उड्डाणे

एअरलाइन्सने सांगितले की ही ऑफर कोणालाही हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. तसेच त्याची देवाणघेवाण करता येत नाही. बदल शुल्क आणि तिकीट शुल्क भरावे लागेल. इंडिगोने सांगितले की, अलीकडेच कोलकाता मार्गे मुंबई-सिलचर आणि दिल्ली-इटानगरसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com