New Rules 1st July 2025: तात्काळ तिकीट बुकिंगपासून ते एटीएममधून पैसे काढण्यापर्यंत... 1 जुलैपासून बदलणार 4 मोठे नियम!

Rule Changes From July 2025: जुलै 2025 च्या सुरुवातीपासूनच अनेक मोठे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल.
New Rules 1st July 2025
Indian moneyDainik Gomantak
Published on
Updated on

Rule Changes From July 2025: जुलै 2025 च्या सुरुवातीपासूनच अनेक मोठे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते बँकिंग सेवांपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल समाविष्ट आहेत. चला तर मग 1 जुलैपासून कोणते नियम बदलत आहेत ते जाणून घेऊया...

रेल्वे तिकीट महाग होणार

भारतीय रेल्वे (Indian Railway) 1 जुलैपासून तिकीटांचे भाडे वाढवू शकते. नॉन-एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैसे आणि एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर 2 पैसे वाढू शकते. लहान प्रवासात ही वाढ किरकोळ असू शकते, परंतु लांब पल्ल्याच्या प्रवाशांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

New Rules 1st July 2025
Cricket New Rule: क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी नवी नियमावली; डोक्याला दुखापत झाल्यास 7 दिवसांची विश्रांती अनिवार्य, काय आहेत नियम?

तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये कडक नियम

तिकीट दलालांवर कारवाई करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आयआरसीटीसीने तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया सुरक्षित केली आहे. 1 जुलैपासून केवळ आधार पडताळणी केलेल्या वापरकर्त्यांनाच तात्काळ तिकीटे बुक करण्याची परवानगी दिली जाईल. 15 जुलैपासून तिकीट बुकिंग करताना ओटीपी आधारित आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. एजंटना बुकिंग सुरु झाल्यानंतर केवळ 30 मिनिटांत तात्काळ तिकीटे बुक करण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीटे मिळण्याची चांगली संधी मिळेल.

एटीएममधून पैसे काढणे महाग होणार

जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल, तर एटीएममधून पैसे काढणे आता मर्यादित आणि महाग होऊ शकते. मेट्रो शहरांमध्ये 3 फ्री ट्रांजक्शननंतर 23 रुपये प्रति कॅश ट्रांजक्शन आणि 8.5 प्रति नॉन-कॅश ट्रांजक्शन आहे, तर मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार आहेत.

New Rules 1st July 2025
ICC New Rule: आता शॉर्ट रन काढल्यास मिळणार शिक्षा, आयसीसीकडून 5 नव्या नियमांची घोषणा! काय झाला मोठा बदल? जाणून घ्या

एलपीजी आणि जेट इंधनाच्या किमतीत बदल होण्याची शक्यता

तसेच, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी आणि विमान इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. 1 जुलै रोजी एलपीजीच्या (LPG) किमतीत कपात किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम घराच्या बजेटवर होईल. या सर्व बदलांचा उद्देश पारदर्शक प्रणाली आणि डिजिटली सुरक्षित करणे आहे, परंतु त्याचवेळी त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर दबाव देखील वाढू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com