Mahindra Thar: दमदार लूक अन् क्लासिक फीचर्ससह येतेय नवीन 'थार'; कारप्रेमींना पाडणार भुरळ!

Manish Jadhav

महिंद्रा थार

महिंद्राची लोकप्रिय एसयूव्ही थारने विक्रीच्या बाबतीत बोलेरोला मागे सोडत कमाल केली. यासह कंपनीची ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी गाडी बनली.

mahindra thar 3 door facelift | Dainik Gomantak

3 डोअर फेसलिफ्ट मॉडेल

थारची वाढती लोकप्रियता लक्षात घेता कंपनीने आता थारचे 3 डोअर फेसलिफ्ट मॉडेल आणण्याची तयारी सुरु केली आहे.

mahindra thar 3 door facelift | Dainik Gomantak

अधिकृत निवेदन

महिंद्राने अद्याप या फेसलिफ्टबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नसले तरी चाचणी दरम्यान दिसणारी एसयूव्ही सर्व काही सांगून जात आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, नव्या मॉडेलमध्ये थार रॉक्समधून घेतलेले अनेक डिझाइन घटक असू शकतात.

mahindra thar 3 door facelift | Dainik Gomantak

फीचर्स

फेसलिफ्ट केलेल्या थारमध्ये नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, नेव्हिगेशन, अॅड्रेनोएक्स, अॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटो आणि हरमन कार्डन साउंड सिस्टिम सारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

mahindra thar 3 door facelift | Dainik Gomantak

इंजिन

इंजिन पर्यायांमध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. थारमध्ये सध्या तीन इंजिन पर्याय आहेत: 1.5 लीटर टर्बो डिझेल: 117 बीएचपी, 300 एनएम आणि 2.0 लीटर टर्बो पेट्रोल जे 150 बीएचपी, 320 एनएम जनरेट करते.

mahindra thar 3 door facelift | Dainik Gomantak

व्हेरिएंट

2.2 लीटर डिझेल 130 बीएचपी, 300 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 2WD आणि 4WD व्हेरिएंटमध्ये येते आणि त्यात 6-स्पीड मॅन्युअल किंवा टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील आहे.

mahindra thar 3 door facelift | Dainik Gomantak

किंमत

फेसलिफ्ट मॉडेलमधील नव्या फीचर्समुळे त्याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते.

mahindra thar 3 door facelift | Dainik Gomantak
आणखी बघा