1 हजार रुपये गुंतवून दोन वर्षांत महिला मिळवू शकतात लाखोंचा परतावा; जाणून घ्या सरकारी स्किमबद्दल सर्वकाही

Mahila Samman Savings Certificate Scheme: जर तुम्ही एक महिला असाल आणि छोट्या बचतीतून मोठा फंड तयार करू इच्छित असाल तर आम्ही याबद्दल माहिती देत ​​आहोत.
Mahila Samman Savings Certificate Scheme
Mahila Samman Savings Certificate SchemeDainik Gomantak

Mahila Samman Savings Certificate Scheme:

देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने बचत योजना सुरू केली आहे.

आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा केली होती. ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आली. कोणतीही मुलगी किंवा महिला या योजनेत सहज गुंतवणूक करू शकते.

या योजनेची विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या वतीने तिचे पालक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. तुम्ही या योजनेत किमान 1000 रुपये गुंतवणूक सुरू करू शकता. यानंतर तुम्ही 100 च्या पटीत गुंतवणूक करणे सुरू ठेवू शकता.

या योजनेत जास्तीत जास्त तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ही योजना फक्त 2 वर्षांसाठी आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला व्याजदरासह ठेव रक्कम मिळेल. ही योजना फक्त भारतीय महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.

किती व्याज मिळणार?

सध्या या योजनेवर सरकारकडून ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. इतर बचत योजना पाहिल्या तर त्यानुसार या योजनेत अधिक चांगले व्याज दिले जात आहे.

तुम्ही भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज करू शकता.

याशिवाय या योजनेत महिला एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतात. एकापेक्षा जास्त खाती उघडण्यासाठी किमान ३ महिन्यांचे अंतर असावे. कोणत्याही वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Mahila Samman Savings Certificate Scheme
कंपनीने EPF खात्यात पैसे जमा केले नाहीत तर घाबरू नका; अशी करा तक्रार झटक्यात होईल कारवाई

आवश्यक कागदपत्रे

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये आधार कार्ड, पॅनकार्ड (PAN Card) आणि फोटो जमा करावा लागणार आहे.

या योजनेत, 7.5 टक्के व्याजासह, तुम्हाला 2 वर्षांत 32 हजार रुपयांचे जास्तीत जास्त व्याज मिळेल आणि 2 वर्षांच्या मुदतीनंतर तुम्हाला 2.32 लाख रुपये परत मिळतील.

ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा आहे.

Mahila Samman Savings Certificate Scheme
Aadhaar Card: घरबसल्या मिळवा ब्लू आधार कार्ड; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सरकारची गुंतवणूक

सरकारने लोकसभेत (Loksabha) दिलेल्या माहितीत, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे 14 लाख खाती उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारने (Indian Government) या योजनेत एकूण 8,630 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही योजना जसजशी प्रसिद्ध होत आहे. हे पाहता सरकारने पोस्ट ऑफिस, सरकारी बँका तसेच अनेक खाजगी बँकांमध्ये ही योजना सुरू केली आहे.

ऑफ इंडिया बँकेने (Bank Of India) आपल्या देशभरातील सर्व शाखांमध्ये या योजनेचे खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com