Saving Scheme: मोदी सरकारने महिलांच्या हितासाठी उचलले हे मोठे पाऊल, या बचत योजनेमधून...

Saving Scheme: मोदी सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ विविध वर्गातील लोकांना मिळत आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Saving Scheme: मोदी सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ विविध वर्गातील लोकांना मिळत आहे. त्याचवेळी मोदी सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे या योजनेचे नाव आहे. विशेषत: महिलांसाठी ही योजना आणण्यात आली असून देशातील महिलांनाही याचा लाभ मिळणार आहे. यातच आता या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया…

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना बजेट 2023 मध्ये एक नवीन लहान बचत योजना म्हणून सादर करण्यात आली, विशेषत: महिला गुंतवणूकदारांना गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन करण्यात आली.

सरकारने (Government) 31 मार्च 2023 रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेद्वारे ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत खाते तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत उघडू शकता.

Prime Minister Narendra Modi
PPF Saving Scheme: सरकारी आदेश! पीपीएफ खातेदारांना करावे लागेल 'हे' काम, अन्यथा...

महिला सन्मान बचत खाते कोण उघडू शकते

महिला सन्मान बचत खाते महिला स्वतःसाठी किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीने उघडू शकते. महिला गुंतवणूकदारांना (Investors) 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी फॉर्म - I भरावा लागेल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची मर्यादा

गुंतवलेली किमान रक्कम रु. 1000 आहे आणि रु. 100 च्या पटीत रक्कम खात्यात जमा केली जाऊ शकते मात्र, त्यानंतरच्या ठेवींना त्या खात्यात परवानगी दिली जाणार नाही. योजनेंतर्गत गुंतवणुकीची कमाल मर्यादा रु. 2 लाख आहे.

Prime Minister Narendra Modi
PPF Scheme: पीपीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, मार्चमध्ये मिळणार एवढी मोठी रक्कम!

व्याजदर

या योजनेअंतर्गत ठेवींवर वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते. व्याज तिमाहीत चक्रवाढ केले जाईल आणि खात्यात जमा केले जाईल.

मॅच्युरीटी पेमेंट

ठेवीची रक्कम ठेवीच्या तारखेपासून दोन वर्षांनी मॅच्युअर होते आणि खातेदार त्यावेळी कार्यालयात फॉर्म-2 मध्ये अर्ज सादर करुन शिल्लक रक्कम मिळवू शकतो.

Prime Minister Narendra Modi
PPF Scheme बाबत केंद्र सरकारने दिली खूशखबर, पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आनंदी-आनंद!

खाते काढणे

खाते उघडल्याच्या तारखेपासून पहिल्या वर्षानंतर परंतु खाते मॅच्युअर होण्यापूर्वी खातेदार फॉर्म-3 अर्ज सबमिट करुन जास्तीत जास्त 40% रक्कम काढू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com