Richest Indian Women: 'धनलक्ष्मी', या आहेत भारतातील 5 सर्वात श्रीमंत महिला, जाणून घ्या सविस्तर

फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत 73 वर्षीय सावित्री जिंदाल 94व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 17 अब्ज डॉलर आहे.
Forbes Richest Indian Women
Forbes Richest Indian WomenDainik Gomantak
Published on
Updated on
सावित्री जिंदाल
सावित्री जिंदालDainik Gomantak

सावित्री जिंदाल

फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत 73 वर्षीय सावित्री जिंदाल 94व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 17 अब्ज डॉलर आहे. सावित्री जिंदाल कधीही कॉलेजमध्ये गेल्या नाहीत. त्यांचा जन्म 1950 मध्ये आसाम मधील तिनसुकिया येथे झाला. 1970 मध्ये तिचा विवाह जिंदाल ग्रुपचे संस्थापक हरियाणातील ओमप्रकाश जिंदाल यांच्याशी झाला.

जिंदाल ग्रुप स्टील आणि इतर अनेक क्षेत्रात सक्रिय आहे. ओपी जिंदाल यांचे 2005 मध्ये निधन झाले. पतीच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी कुटुंबासह संपूर्ण व्यवसाय सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली जिंदाल ग्रुपचा व्यवसाय भरभराटीला येत आहे.

रोशनी नादर मल्होत्रा
रोशनी नादर मल्होत्राDainik Gomantak

रोशनी नादर मल्होत्रा

देशातील दुसऱ्या अब्जाधीश महिलांमध्ये, किरण मुझुमदार शॉ, रोशनी नाडरपासून फाल्गुनी नायर यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या लीडिंग वेल्थी वुमन 2021 अहवालाकडे पाहता, HCL चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा ​​यांची एकूण संपत्ती 84, 330 कोटी रुपये आहे. श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचा टॉप-5 मध्ये समावेश आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या फोर्बच्या रिच लिस्ट 2023 मध्ये त्यांचे वडील शिव नाडर यांचा भारतातील तिसरा श्रीमंत व्यक्ती म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Forbes Richest Indian Women
Jammu-Kashmir: पाकिस्तानच्या नव्या कुरापती; ड्रोनद्वारे जम्मूमध्ये पाठवले चिनी पिस्तूल, काडतुसे आणि हातबॉम्ब
रेखा झुनझुनवाला
रेखा झुनझुनवालाDainik Gomantak

रेखा झुनझुनवाला

भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला फोर्ब्स इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत 30व्या स्थानावर आहेत. श्रीमंत भारतीय महिलांमध्ये समाविष्ट असलेल्या रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती 5.9 अब्ज डॉलर किंवा 47,650.76 कोटी रुपये आहे. झुंजनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँड्सचा समावेश आहे.

फाल्गुनी नायर
फाल्गुनी नायरDainik Gomantak

फाल्गुनी नायर

भारतातील आघाडीच्या सौंदर्य उत्पादने निर्माती कंपनी Nykaa च्या संस्थापक आणि CEO फाल्गुनी नायर देखील देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत कायम आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज डॉलर किंवा 22,192 कोटी रुपये आहे. न्याकाचा अर्धा भाग फाल्गुनी नायर यांच्याकडे आहे. कंपनीची स्थापना 2012 मध्ये माजी इन्व्हेस्टमेंट बँकर फाल्गुनी नायर यांनी केली होती.

IIM अहमदाबादच्या पदवीधर फाल्गुनीने सौंदर्य आणि जीवनशैलीचे किरकोळ साम्राज्य तयार केले आहे. न्याका भारतातील 1500 हून अधिक ब्रँड्सच्या पोर्टफोलिओसह भारतातील आघाडीची ब्युटी रिटेलर म्हणून उदयास आले आहे. त्या 1600 हून अधिक लोकांच्या टीमचे नेतृत्व करतात.

Forbes Richest Indian Women
Israel Airstrike: अल-अक्सा मशिदचा वाद पेटला? इस्रायलचा लेबनॉन-गाझा पट्टीवर हवाई हल्ला
किरण मुझुमदार-शॉ
किरण मुझुमदार-शॉDainik Gomantak

किरण मुझुमदार-शॉ

फार्मा क्षेत्रातील दिग्गज बायोकॉनच्या चेअरपर्सन किरण मुझुमदार-शॉ यांचा दीर्घ काळापासून देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम इंडेक्सनुसार, सध्या त्यांची एकूण संपत्ती 2 अब्ज डॉलर किंवा 16,438 कोटी रुपये आहे. कोरोनाच्या काळात त्यांच्या कंपनीच्या कमाईत मोठी वाढ नोंदवण्यात आली. 1953 मध्ये जन्मलेल्या 69 वर्षीय किरण मुझुमदार शॉ यांनी 1978 मध्ये बायोकॉनची सुरुवात केली. 2019 मध्ये, फोर्ब्स मासिकाने तिला जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 68 वे स्थान दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

470 Women Killed In Pakistan Karo Kari 2025
Cold water during periods myth
World's first trillionaire Elon Musk
SAFF Women's Championship 2026 Final
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com