गौतम अदानी यांना मिळाली LIC ची साथ; अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती म्हणाले

अदानी यांच्या कंपनीत गुंतवणूक करून एलआयसीचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
LIC has not suffered any loss by investing in Adani's company says sidharth mohanti
LIC has not suffered any loss by investing in Adani's company says sidharth mohanti Dainik Gomantak
Published on
Updated on

LIC: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ची सध्या खूप चर्चा होत आहे. अविश्वास ठरावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एलआयसीचे कौतुक केले. एलआयसीचे किती मजबूत आणि मोठे नेटवर्क आहे याबद्दल बोलले

LIC has not suffered any loss by investing in Adani's company says sidharth mohanti
आता तुम्ही SBI Card द्वारे करू शकता UPI पेमेंट, जाणून घ्या प्रोसेस

एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी पंतप्रधान मोदींच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की पीएमच्या स्तुतीचा परिणाम कंपनीच्या भविष्यातील निकालांवरही दिसून येईल.

पंतप्रधानांच्या स्तुतीने आत्मविश्वास वाढला

टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल उत्साहित आणि कृतज्ञ आहोत. तसेच, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो.

ते पुढे म्हणाले की, जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एलआयसीचे कौतुक केले, तेव्हापासून गुंतवणूकदार, पॉलिसीधारक आणि भागधारकांप्रती आमची जबाबदारी आणि उत्तरदायित्व वाढले आहे.

LIC has not suffered any loss by investing in Adani's company says sidharth mohanti
PPF Scheme: पीपीएफ योजनेत पैसे गुंतवत असाल तर 'ही' चूक करु नका! नाहीतर...

अदानीमध्ये गुंतवणुकीत नुकसान नाही

ते म्हणाले की, आम्हाला कोणत्याही एका कंपनीबद्दल बोलायचे नाही, पण अदानी यांच्या कंपनीत गुंतवणूक करून एलआयसीचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

ते म्हणाले की आम्ही धोरणे आणि प्रोटोकॉल अंतर्गत अदानीमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या शेअर्सचे भाव कमी असताना आम्ही गुंतवणूक केली आणि भाव वाढू लागताच आम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळाला.

ते म्हणाले की, आम्ही आमचा अंतर्गत प्रोटोकॉल आणि नियमन लक्षात घेऊन अदानीमध्ये गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. येथे 13 लाख विमा एजंट आहेत. ते म्हणाले की, एजंट्सची संख्या वाढवण्याची गरज आहे जेणेकरून देशाची अधिक कव्हरेज करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com