Vande Bharat
Vande BharatDainik Gomantak

Vande Bharat: 130 किमी स्पीड, 6 तासात 520 किमी; 'या' मार्गावर धावणार देशातील 17वी वंदे भारत एक्सप्रेस!

Vande Bharat News: देशात लवकरच 17वी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. हावडा ते पुरी दरम्यान ही सेमी हायस्पीड ट्रेन धावेल.
Published on

Vande Bharat News: देशात लवकरच 17वी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. हावडा ते पुरी दरम्यान ही सेमी हायस्पीड ट्रेन धावेल. त्याचे उद्घाटन 15 मे रोजी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हावडा-पुरी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवू शकतात. ही ट्रेन कुठे थांबणार, तिची वेळ काय असेल याबाबत सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ओडिशासाठी (Odisha) वंदे भारत ट्रेनची ही पहिली भेट असेल, तर बंगालसाठी दुसरी. यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणीही झाली होती.

त्यानंतर ही गाडी खरगपूर, बालासोर, भद्रक, जाजपूर, केओंझार रोड, कटक, भुवनेश्वर आणि खुर्दा येथे प्रत्येकी दोन मिनिटे थांबली.

6 तासात 520 किमी

हावडा आणि पुरी दरम्यान धावणारी ही 17वी वंदे भारत एक्सप्रेस 6 तासात 520 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन 28 आणि 30 एप्रिल रोजी झाली.

त्यावेळी ही ट्रेन बंगालमधील हावडा स्टेशनवरुन सकाळी 6.10 वाजता निघाली आणि 6 तासांत पुरी येथे पोहोचली.

Vande Bharat
Vande Bharat: 'या' राज्यातील लोकांसाठी मोठी बातमी, लवकरच मिळणार पाच ते सहा वंदे भारत ट्रेन?

वेळ काय असू शकते?

देशातील 17वी वंदे भारत ट्रेन (हावडा ते पुरी) ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही ट्रेन हावडाहून पुरीसाठी सकाळी 6.10 वाजता सुटेल.

सकाळी 7.38 वाजता खरगपूर, सकाळी 9.45 वाजता भद्रक, 10.25 वाजता जाजपूर केंदुझार रोड, सकाळी 11.00 वाजता कटक, 11.25 वाजता भुवनेश्वर, 11.45 वाजता खुर्दा रोड आणि 12.35 वाजता पुरी येथे पोहोचेल. यानंतर ही ट्रेन पुरीहून हावड्यासाठी दुपारी 1.50 वाजता सुटेल आणि सकाळी 8.30 वाजता पोहोचेल.

Vande Bharat
Vande Bharat Train New Route: आता 'या' नव्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू; PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, पाहा व्हिडिओ

दुसरीकडे, गेल्या महिन्यात पीएम मोदींनी केरळमधील (Kerala) पहिल्या वंदे भारत ट्रेनला तिरुवनंतपुरम रेल्वे स्थानकावरुन हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन कासारगोड येथून सुरु होते आणि 7 तास 50 मिनिटांत तिरुअनंतपुरमला पोहोचते. ट्रेन कोल्लम, कोट्टायम, त्रिशूर, शोरानूर, कोझिकोड आणि कन्नूर येथे थांबते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com