Oppo A5 Pro 5G: 'ओप्पो'चा बजेट फ्रेंडली Smartphone लाँच; मिळणार तगडे फीचर्स अन् सुपरफास्ट चार्जिंग, किंमत फक्त...

Oppo A5 Pro 5G launch: स्मार्टफोन कंपनी ओप्पोनं भारतीय बाजारात नवीन Oppo A5 Pro 5G लाँच केला आहे. नवीन डिझाइन, प्रीमियम लूकसह हा स्मार्टफोन खास डिझाइन करण्यात आला आहे.
Oppo A5 Pro 5G
Oppo A5 Pro 5GDainik Gomantak
Published on
Updated on

स्मार्टफोन कंपनी ओप्पोनं भारतीय बाजारात नवीन Oppo A5 Pro 5G लाँच केला आहे. नवीन डिझाइन, प्रीमियम लूक आणि दमदार वैशिष्टं असलेला हा स्मार्टफोन खास डिझाइन करण्यात आला आहे. MediaTek Dimensity 6300 चिपसेटसह आलेल्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा शक्तिशाली कॅमेरा आणि 5800 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

ग्राहकांना हा स्मार्टफोन Amazon, Flipkart तसंच Oppo India च्या अधिकृत ई-स्टोअरवर खरेदी करता येणार. काही निवडक बँक कार्ड्सवर 1500 पर्यंत कॅशबॅकचा लाभ दिला जात आहे.

तसंच, सहा महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय चा पर्यायही उपलब्ध आहे. फोन दोन आकर्षक रंगांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Oppo A5 Pro 5G
Goa Politics: गुडलरवरची कारवाई सेटिंग बिघडल्याने, दिवसाला एका महिलेवर अत्याचार; वाढत्या गुन्हेगारीमुळे आपचे सरकारवर टीकास्त्र

कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेजचा फोन तुम्हाला 17,999 रूपयांना खरेदी करता येणार आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेजचा फोन तुम्हाला 19,999 रूपयांना खरेदी करता येणार आहे.

Oppo A5 Pro 5G मोबाईलची प्रमुख वैशिष्ट्यं

  • डिस्प्ले: 6.67 इंच फुल एचडी+ HD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह

  • ब्राइटनेस: 1000 निट्स पीक ब्राइटनेस, गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन

  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 6300 6nm चिपसेट

  • रॅम आणि स्टोरेज: 8GB LPDDR4X RAM, 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज

  • बॅटरी: 5800mAh, 45W SUPERVOOC फास्ट चार्जिंग

  • कॅमेरा सेटअप: रिअर: 50MP प्रायमरी सेन्सर + 2MP डेप्थ सेन्सर, फ्रंट: ८MP सेल्फी कॅमेरा

Oppo A5 Pro 5G
Goa Politics: गुडलरवरची कारवाई सेटिंग बिघडल्याने, दिवसाला एका महिलेवर अत्याचार; वाढत्या गुन्हेगारीमुळे आपचे सरकारवर टीकास्त्र

Oppo A5 Pro 5G मध्ये AI आधारित फोटोग्राफी मोड, ज्यामुळे फोटो अधिक चांगले येतात. स्ट्रेस-फ्री मल्टीटास्किंगमुळे एकाचवेळी अनेक अ‍ॅप्स चालवताना फोन हँग होत नाही. 6.67 इंचाचा मोठी स्क्रीन आणि 120Hz रिफ्रेश रेट असल्यामुळे गेमिंगसाठी हा फोन योग्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com