Interceptor 650: सध्या तरुणाईत वेगवेगळ्या बाईकची मोठे वेड दिसून येते.बाजारात रॉयल एनफील्डने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तरुणाईकडून रॉयल एनफील्डला चांगलीच पसंती मिळताना दिसते. रॉयल एनफील्डचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात.
2019 मध्ये इंटरसेप्टर 650 रॉयल एनफील्डचे नवे मॉडेल लॉंच केले होते. आता यात कंपनीने काही बदल केले आहेत.
कंपनीने जुन्या इंटरसेप्टर 650 मध्ये काय बदल केले आहेत हे जाणून घेऊयात
1. रंग: कंपनीने या मॉडेलमध्ये आणखी दोन रंगाची भर टाकली आहे.काळा आणि निळ्या रंगाचा समावेश केला आहे.त्यामुळे रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० खरेदी करणाऱ्यांना निवड करण्यासाठी वाव असणार आहे. हे नवीन रंग असलेल्या बाईकची किंमत कंपनीने अजून जाहीर केली नाही.
2. चाके: इंटरसेप्टर 650 च्या चाकात बदल केला आहे. Super Meteor 650 सारखेच यामध्ये 18 इंचाचे अलॉय व्हील बसवले आहेत.
3. हेडलाइट: हेडलाइटमध्ये हॅलोजनचा वापर न करता एलइडीचा वापर केला आहे.
4. स्वीचगिअर: इंटरसेप्टर 650 मध्ये आता लो, हाय आणि इग्नीशनसाठी एक रोटरी डायल बटन दिले आहे.
कंपनीने बाईकच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नसली तरी रॉयल एनफील्डप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.