EPFO: वृद्धापकाळात मिळवा भरगोस पेन्शन ; 3 'मे'पर्यंत आहे मुदत

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भागधारकांसाठी उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेत सुधारणा करून ही मुदत वाढवली आहे.
EPFO
EPFO Dainik Gomantak
Published on
Updated on

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भागधारकांसाठी उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता हे काम करण्यासाठी अर्जदारांकडे 3 मे 2023 पर्यंत वेळ आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले होते की, सर्व पात्र सदस्यांना हा पर्याय निवडण्यासाठी चार महिने आहेत आणि त्याची अंतिम तारीख 3 मार्च 2023 होती. 

3 मे 2023 पर्यंत मुदत वाढवली

PTI नुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सोमवारी शेवटच्या तारखेत सुधारणा केली आहे. या अंतर्गत, पात्र सदस्य आता 3 मे 2023 पर्यंत सेवानिवृत्ती निधी संस्थेच्या एकात्मिक सदस्य पोर्टलवर यासाठी अर्ज करू शकतील.

 EPFO च्या एकात्मिक सदस्य पोर्टलवर अलीकडेच सक्रिय केलेल्या URL लिंकवरून हे देखील स्पष्ट झाले आहे की उच्च पेन्शन निवडण्याची अंतिम तारीख 3 मे आहे. कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत उच्च पेन्शन पर्याय निवडण्याची प्रक्रिया इपीइफओ (EPFO) ​​ने गेल्या आठवड्यातच जारी केली होती.

EPFO
Goa Petrol Diesel Price: इंधनाचे आजचे दर जाहीर, गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या

नोव्हेंबर 2022 मध्ये आदेश देण्यात आला होता 

अधिक पेन्शन पर्यायासाठी EPFO ​​ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता सदस्य आणि नियोक्ता EPS अंतर्गत संयुक्तपणे अर्ज करू शकतील. नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने कर्मचारी पेन्शन योजना 2014 वर शिक्कामोर्तब केले होते. 

22 ऑगस्ट 2014 च्या EPS सुधारणाद्वारे पेन्शनपात्र पगाराची मर्यादा 6,500 रुपये प्रति महिना वरून 15,000 रुपये प्रति महिना करण्यात आली. यासह सदस्य आणि नियोक्ते यांना त्यांच्या वास्तविक पगाराच्या 8.33% EPS मध्ये योगदान देण्याची परवानगी होती.

  • सध्या आधारावर पेन्शन तयार होते

कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत 15,000 रुपयांपर्यंतच्या पगारानुसार पेन्शन फंडात योगदान निश्चित केले जाते. याचा सरळ अर्थ असा की एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन जरी ५०,००० रुपये झाले तरी, EPS मध्ये योगदान केवळ 15,000 रुपयांच्या आधारावर निश्चित केले जाते. यामुळे कर्मचाऱ्याच्या ईपीएसमध्ये कमी जमा होते आणि पेन्शन पण कमी होते. आता त्यांना अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय देऊन ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

प्रत्येक अर्जाची नोंदणी केली जाईल

उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी प्रत्येक अर्जाची नोंदणी केली जाईल, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सांगण्यात आले आहे. अर्जाची प्रक्रिया डिजिटली लॉग इन करून पूर्ण केली जाईल. तसेच अर्जदाराला पावती क्रमांक दिला जाईल. संबंधित प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्रभारी उच्च पेन्शनसह एकत्रित पर्यायासाठी र्ज केलेल्या प्रकरणाची छाननी करतील आणि अर्जदाराला ई-मेल/पोस्टद्वारे आणि नंतर एसएमएसद्वारे माहिती दिली जाइल.

  • ऑफलाइन अर्ज कसे करावे

- EPS सदस्याला त्याच्या जवळच्या EPFO ​​कार्यालयात जावे लागेल.

- अर्जासोबत सर्व संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.

- जॉंइट पर्यायामध्ये डिस्क्लेमर आणि डिक्लेरेशनचा पर्याय निवडावा लागेल.

- पीएफ ते पेन्शन फंडामध्ये समायोजन करण्यासाठी, संयुक्त स्वरूपात कर्मचाऱ्याची संमती आवश्यक असेल.

- अर्ज सादर केल्यानंतर लवकरच URL कळवले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com