तुम्हाला गोल्ड, क्लासिक आणि प्लॅटिनम कार्डमधील फरक माहित आहे का?

Debit and Credit Card: क्लासिक कार्ड हे अतिशय मूलभूत कार्ड आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहक सेवा उपलब्ध आहेत.
Debit and Credit Card
Debit and Credit CardDainik Gomantak
Published on
Updated on

Different Types of Debit/Credit Card: गेल्या एकूण वर्षांत क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर खूप वेगाने वाढला आहे. लोक बँकेत त्यांचे खाते उघडताच, बँक त्यांना आपोआप डेबिट कार्ड जारी करते. मात्र, बहुतेक ग्राहक त्यांच्या गरजेनुसार कार्ड निवडतात. काही ग्राहक खाते उघडताना डिफॉल्टनुसार कार्ड निवडतात. परंतु, अनेक वेळा त्यांनी निवडलेली कार्ड त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाहीत. तेव्हा जाणून घेवूया visa आणि RuPay कार्डशी संबंधित वैशिष्ट्यांबद्दल... (Debit and Credit Card)

क्लासिक कार्ड (Classic Visa Card)

क्लासिक व्हिसा कार्ड हे अतिशय मूलभूत कार्ड आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहक सेवा उपलब्ध आहेत. यासोबतच तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवे तेव्हा हे कार्ड तुम्ही बदलू शकता. या कार्डद्वारे तुम्ही आणीबाणीच्या परिस्थितीत पैसेही काढू शकता.

Debit and Credit Card
PM Shram Yogi Mandhan Yojana: जर तुम्ही 'या' योजनेत 1.80 रुपये गुंतवले तर...

गोल्ड कार्ड (Gold Visa Card)

गोल्ड व्हिसा कार्ड तुम्हाला ट्रॅव्हल असिस्टंट, ग्लोबल कस्टमर असिस्टन्स सर्व्हिसेस यासारख्या सुविधा मिळविण्यात मदत करते. हे कार्ड जगभर स्वीकारले जाते. हे कार्ड ग्लोबल एटीएम नेटवर्कवर उपलब्ध आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही कार्ड वापरू शकता. यासोबतच रिटेल, डायनिंग आणि एंटरटेनमेंट आउटलेटवर हे कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला सूटही मिळते.

प्लॅटिनम कार्ड (Platinum Card)

प्लॅटिनम कार्ड हे गोल्डन कार्डप्रमाणे जगभरात स्वीकारले जाते. या कार्डद्वारे तुम्हाला ग्लोबल एटीएम नेटवर्कची सुविधा मिळते. यासोबतच वैद्यकीय आणि कायदेशीर रेफरल आणि असिस्टंटचे फायदेही उपलब्ध आहेत. या कार्डावर इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत जसे की विविध ऑफर्स, शेकडो डील, डिस्काउंट इ.

सिग्नेचर कार्डवर (Signature Card)

सिग्नेचर कार्ड, तुम्हाला अनेक प्रकारच्या ऑफर्स, शेकडो डील, डिस्काउंट ऑफर अशा अनेक सुविधा मिळतात. यासोबतच तुम्हाला एअरपोर्ट लाउंज ऍक्सेस सारख्या प्रीमियम सुविधा देखील मिळतात.

Debit and Credit Card
क्रिप्टोकरन्सी गुन्ह्यांमध्ये घट, परंतु या '5' बनावट वेबसाइट्सपासून रहा सावध

RuPay कार्डचे अनेक प्रकार आहेत

भारतात आढळणारे RuPay कार्ड देखील ग्राहकांना तीन प्रकारच्या कार्डांची सुविधा देते. यामध्ये क्लासिक, प्लॅटिनम आणि सिलेक्ट कार्डचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com