PM Shram Yogi Mandhan Yojana: जर तुम्ही 'या' योजनेत 1.80 रुपये गुंतवले तर...

जर तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही दरमहा 3 हजार रुपये मासिक पेन्शन (Pension) मिळवू शकता.
Indian Currency
Indian CurrencyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात कामगारांची मोठी संख्या आहे. असंघटित क्षेत्राशी संबंधित हे लोक रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करतात. याशिवाय या लोकांना हंगामी बेरोजगारीचाही सामना करावा लागतो. त्यामुळे या कामगारांचे जीवन आर्थिक संकटाने ग्रसित असते. या लोकांकडे त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने कोणतीही विशेष योजना नाही. असंघटित क्षेत्रातील लोकांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने एक विशेष योजना सुरु केली आहे, तिचे नाव आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना. ही योजना विशेषत: असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये दररोज केवळ 1.80 रुपये गुंतवून तुम्ही 3 हजार रुपयांच्या पेन्शनचा (Pension) लाभ घेऊ शकता. यामध्ये आपण पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया - (If you Invest Rs 1.80 In PM Shram Yogi Mandhan Yojana, You Will Get A Rs 3000 Pension)

दरम्यान, जर तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही दरमहा 3 हजार रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता.

तसेच, या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुमचे वय 18 वर्षे असेल तर तुम्हाला या योजनेत दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे, ज्यांचे वय 29 वर्षे आहे त्यांना या योजनेत 100 रुपये गुंतवावे लागतील आणि 40 वर्षे वय असलेल्यांना या योजनेत दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. या योजनेंतर्गत तुमचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल.

Indian Currency
PM Kisan: असा मिळवा पीएम किसानचा न मिळालेला हप्ता

शिवाय, असंघटित क्षेत्राशी संबंधित कोणताही कामगार या योजनेत गुंतवणूक करु शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी त्याचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. देशात असंघटित क्षेत्रात करोडो लोक आहेत. ठराविक काळानंतर त्यांचे उत्पन्नाचे सर्व स्रोत थांबतात. हे लक्षात घेऊन ही योजना भारत सरकारकडून सुरु करण्यात आली. सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असंघटित क्षेत्राशी निगडित कामगार आणि कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम करेल. ESIC आणि EPFO​सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. आजकाल भारतातील असंघटित क्षेत्राशी संबंधित मोठ्या संख्येने कामगार त्यांचे ई-श्रम कार्ड बनवत आहेत. कामगारांनी ई-श्रम कार्ड बनवण्यासोबतच या योजनेत गुंतवणूक करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com