
भारतात लोक किआला केवळ त्यांच्या एसयूव्ही आणि एमपीव्ही वाहनांसाठी ओळखतात, परंतु जागतिक स्तरावर किआ ही परवडणाऱ्या लक्झरी कार बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. आता किआ जागतिक स्तरावर आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे ही कार टेस्ला आणि बीवायडी सारख्या इलेक्ट्रिक कारचा खेळ खराब करु शकते. किआने त्यांची पहिली जागतिक इलेक्ट्रिक सेडान कार किआ ईव्ही4 पेश केली. किआने ही कार पहिल्यांदाच न्यू यॉर्क इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये जगासमोर सादर केली. चला तर मग दमदार आणि कारप्रेमींना भुरळ पाडणाऱ्या या कारबाबत जाणून घेऊया...
किआची EV4 कार त्यांच्या 400V इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर विकसित करण्यात आली आहे. कंपनीने या प्लॅटफॉर्मवर EV6 आणि EV9 सारख्या कार विकसित केल्या आहेत. कंपनीने या सेडानला स्पोर्टी लूक दिला आहे. तर मागील बाजूस टेललाइट्स दिल्या आहेत. कारचा बंपर खूपच आकर्षक बनवण्यात आला आहे. ही कार 17 इंचाच्या एरो व्हील्ससह लॉन्च होईल असे सांगण्यात आले आहे. परंतु कंपनी 19-इंच व्हिल्सचा देखील पर्याय देऊ शकते. या कारमध्ये (Car) 30 इंचाचा रुंद स्क्रीन डिस्प्ले आहे. यात 12.3 इंचाचा ड्युअल स्क्रीन आणि 5 इंचाचा क्लायमेट डिस्प्ले आहे.
कारमध्ये दोन बॅटरी पर्याय आहेत. त्यातील 58.3 kWh बॅटरी पॅक 378 किमीची रेंज देईल. तर 81.4 kWh बॅटरी पॅक 531 किमी पर्यंतची रेंज देईल. ही एक फ्रंट व्हील ड्राइव्ह कार आहे. यात 150 किलोवॅटची मोटर आहे, जी कारला उत्कृष्ट परफार्मन्स देते. लहान बॅटरीने सुसज्ज असलेली ही कार डीसी फास्ट चार्जिंग वापरुन फक्त 29 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते. तर मोठ्या बॅटरी पॅकसह हा वेळ 31 मिनिटांपर्यंत वाढतो.
सध्या, जगातील प्रमुख कार कंपन्यांपैकी केवळ टेस्ला (Tesla) आणि बीवायडी या कंपन्याच प्रामुख्याने इलेक्ट्रिक सेडान कार बनवतात. भारतासारख्या (India) मोठ्या बाजारपेठेत, टाटा मोटर्सची टिगोर ही देखील एक इलेक्ट्रिक सेडान कार आहे. अशा परिस्थितीत, किआची भारतात आधीच मजबूत उपस्थिती BYD आणि टेस्लाला या सेगमेंटमध्ये टक्कर देऊ शकते. Kia EV4 ची अपेक्षित किंमत 15 ते 20 लाखांच्या दरम्यान असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.