'जिओ फोन नेक्स्ट' दुकानांमध्ये उपलब्ध; जाणून घ्या फोनची वैशिष्टे

जिओ फोनची किंमत 6,499 रुपये आहे.
Jio Phone Next
Jio Phone Next Dainik Gomantak
Published on
Updated on

जिओ कंपनीचा 'जिओ फोन नेक्स्ट' हा स्मार्टफोन आता दुकानांमध्ये उपलब्ध झाला आहे. कंपनीने गुगलच्या मदतीने हा फोन तयार केला आहे. जिओ फोन सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. फोनची किंमत फक्त 6,499 रुपये आहे. (Jio News)

Jio Phone Next
Airtel अन् Axis Bankचं साटंलोटं; लॉन्च केलं को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड

ग्राहक जिओ (Jio) फोन EMI वर विकत घेऊ शकतात. यामध्ये 2 प्रकारचे EMI पर्याय उपलब्ध आहेत. जिओचा हा फोन (Phone) प्रगती OS वर काम करतो. हा हँडसेट 5.45-इंचाच्या HD+ स्क्रीनसह येतो, ज्याच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा वापर करण्यात आला आहे. हँडसेट क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरवर काम करतो. फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

जिओ फोनमध्ये 13MP रियर कॅमेरा (Camera) आहे, तर समोर 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 3500mAh बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात मायक्रो-यूएसबी पोर्ट, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ब्लूटूथ, वाय-फाय आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे. हँडसेट गुगल असिस्टंट सपोर्टसह येतो. यामध्ये भाषांतराची सुविधा स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com