Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G फोन, किंमत फक्त 1299 रुपये; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स?

Jio Bharat: जुलैमध्ये जिओने त्यांच्या 'जिओ भारत' फोन प्लॅटफॉर्मचे अनावरण केले होते. सध्याच्या 250 दशलक्ष फीचर फोन यूजर्सना परवडणाऱ्या किमतीत इंटरनेट-सक्षम फोन पुरवण्याचे लक्ष्य आहे.
Jio Bharat|Jio Smartphones
Jio Bharat|Jio SmartphonesDainik Gomantak
Published on
Updated on

Jio launches cheapest 4G phone, priced at just Rs 1299; Know what are the new features?:

Jio ने आपल्या Jio Bharat सिरीजचा भाग म्हणून एक नवीन 4G फोन लॉन्च केला आहे. ज्याला Jio Bharat किंवा B1 नावाने ओळखले जाईल. हे डिव्‍हाइस बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या Jio Bharat V-2 आणि K-1 कार्बन मॉडेल्सपेक्षा थोडेसे अपग्रेड आहे.

जुलैमध्ये रिलायन्स जिओने त्यांच्या 'जिओ भारत' फोन प्लॅटफॉर्मचे अनावरण केले होते. ज्याने सध्याच्या 250 दशलक्ष फीचर फोन यूजर्सना परवडणाऱ्या किमतीत इंटरनेट-सक्षम फोन पुरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यातून 'टूजी मुक्त भारता'कडे वाटचाल करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Jio Bharat|Jio Smartphones
परवानगीशिवाय फोन कॉल रेकॉर्ड करणे Right To Privacy चे उल्लंघन; हायकोर्टाने पतीला फटकारले

Jio Bharat B1 फोनची फीचर्स

  • Jio च्या अधिकृत वेबसाइटवर Jio Bharat B1 सीरीजची किंमत 1299 रुपये आहे.

  • हा 2.4-इंच स्क्रीन आणि 2000 mAh बॅटरीसह बजेट-अनुकूल 4G फोन आहे.

  • मागील व्हर्जनच्या तुलनेत किरकोळ सुधारणा, स्क्रीन आणि बॅटरी क्षमतेमध्ये कोणतेही मोठे बदल नाहीत.

  • फोनमध्ये कॅमेरा आहे, मात्र कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये उघड करण्यात आलेली नाहीत.

  • चित्रपट, व्हिडिओ आणि स्पोर्ट्स हायलाइट्सचा आनंद घेण्यासाठी प्री-इंस्टॉल्ड Jio App.

  • हा हँडसेट 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. तसेच, UPI पेमेंटसाठी JioPay App ची सुविधा देण्यात आली आहे.

  • Jio सिम कार्डसह विशेष सुसंगतता, नॉन-जिओ सिम कार्ड वापरता येत नाहीत.

Jio Bharat|Jio Smartphones
Lulu Mall: भाजप महिला नेत्याच्या फेक फोटोमुळे निष्पाप मॅनेजरने गमावली नोकरी, सत्य समोर येताच...

रिलायन्स जिओचे इतर फोन्स

  • Jio फोन: 1 जुलै 2017 ला लॉन्च झाला. ज्याची किंमत सुमारे 1,500 रुपये आहे.

  • Jio Phone 2: 1 जुलै 2018 ला लॉन्च झाला. ज्याची किंमत सुमारे 3,000 रुपये आहे.

  • Jio Phone Next: हा स्मार्टफोन 4 नोव्हेंबर 2021 रोजी बाजारात आला, त्याची किंमत सुमारे 5,000 रुपये आहे.

  • Jio Bharat V2 आणि K1 कार्बन: हे स्मार्टफोन्स या वर्षी जुलैमध्ये सादर करण्यात आले होते, ज्यांची किंमत 999 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com