Account Holders
Account HoldersDainik Gomantak

Jan Dhan Account: जनधन खातेदारांसाठी मोठी बातमी, केंद्रीय मंत्र्यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

Jan Dhan Account Benefits: तुम्ही जर जन धन खाते उघडले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Published on

How to Open Jan Dhan Account Online: तुम्ही जर जन धन खाते उघडले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. योजनांशी संबंधित पैसे सरकारकडून थेट जनधन खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. या संदर्भात केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी (G Kishan Reddy) म्हणाले की, 'प्रधानमंत्री जन-धन योजने' अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांद्वारे आतापर्यंत 25 लाख कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित केले गेले आहेत.'

75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे ऑनलाइन उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वतीने 75 डिजिटल बँकिंग युनिट्सच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी जनगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना रेड्डी म्हणाले की, 'विविध कल्याणकारी योजना आणि सबसिडी अंतर्गत या खात्यांद्वारे लाभार्थ्यांना निधी पाठविला जातो. या 50 कोटी जनधन खात्यांपैकी निम्मी खाती महिलांची आहेत.'

Account Holders
PM मोदींकडून शेतकऱ्यांना कोणतं दिवाळी गिफ्ट मिळणार? वाचा एका क्लिकवर

गरिबांच्या जनधन बँक खात्यात 1.75 लाख कोटी रुपये

“जन धन खाती उघडताना लोक प्रश्न उपस्थित करत होते की, आपल्या देशात याची गरज आहे का? आज आम्ही जन-धन खात्यांद्वारे गरीब लोकांसाठी कल्याणकारी योजनांसाठी 25 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. ती एक उपलब्धी आहे, असे रेड्डी म्हणाले. रेड्डी पुढे म्हणाले की, 'आज गरिबांच्या जनधन बँक खात्यात 1.75 लाख कोटी रुपये जमा आहेत.'

75 DBU राष्ट्राला समर्पित

यापूर्वी, कर्नाटक (Karnataka) बँकेच्या दोन डिजिटल बँकिंग युनिट्सने (DBUs) काम सुरु केले. पीएम मोदींनी विविध बँकांचे 75 डीबीयू राष्ट्राला समर्पित केले. यामध्ये कर्नाटक बँकेच्या या दोन्ही डीबीयूचा समावेश आहे. DBUs कार्यक्षम, पेपरलेस, सुरक्षित, कनेक्टेड वातावरणात कार्य करतील जिथे ते ग्राहकांना स्वयं-सेवा आणि सहाय्य (Digital) मोडमध्ये बँकिंग वस्तू आणि सेवा प्रदान करतील.

Account Holders
PM Kisan: लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिवाळी भेट, या दिवशी खात्यात येणार 12 वा हप्ता

याशिवाय, डीबीयू संबंधित जिल्ह्यात आर्थिक समावेशन आणि डिजिटल बँकिंग साक्षरतेला प्रोत्साहन देत आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्ष एमएस महाबळेश्वर यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'दोन डीबीयू उघडण्यासाठी बँकेची निवड करण्यात आली आहे. बँक शताब्दी वर्षात पदार्पण करत असल्याने हा विशेष सन्मान आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com