बदलत्या काळानुसार भारतात डिजिटायझेशन खूप वेगाने वाढले आहे. अशा परिस्थितीत आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन असतो. याद्वारे तो अवघ्या दोन मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत आहे. वाढत्या डिजिटायझेशनसोबतच सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या योजनांच्या नावाने लोकांना एसएमएस किंवा ईमेल पाठवतात. यानंतर, ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरणे आणि त्यांची खाती रिकामी करणे अशी प्रकरणे घडतात. (PIB Fact Check of Viral Message of Government Scheme)
सध्या सोशल मीडियावर पीएम आवास योजनेच्या नावाने एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, भारत सरकारने पीएम आवास योजनेअंतर्गत प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. सबका विकास महा क्विझ असे या क्विझचे नाव आहे. व्हायरल मेसेजची सत्यता शोधण्यासाठी आणि लोकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांपासून रोखण्यासाठी PIB तथ्य-तपासणी करते. या व्हायरल मेसेजची फॅक्ट चेकही करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.