IRCTC Down: रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग खोळंबले; आयआरसीटीसीचे संकेतस्थळ, मोबाईल App ठप्प

IRCTC Outage: वर्षाअखेर आणि सुट्टीचा कालावधी सुरु असल्याने अनेकजण विविध ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला पसंती देत आहेत.
IRCTC Down: रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग खोळंबले; आयआरसीटीसीचे संकेतस्थळ, मोबाईल App ठप्प
IRCTC OutageDainik Gomantak
Published on
Updated on

रेल्वेची ऑनलाईन तिकिट बुकिंग सुविधा खोळंबली आहे. सकाळपासून IRCTC चे संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन ठप्प झाले आहे. संकेतस्थळ किंवा अ‍ॅप्लिकेशनवरुन तिकिट बुक करण्यास अडथळा येत असल्याची तक्रार अनेकजण सोशल मिडियावरुन करतायेत.

अविनाश मिश्रा या एक्स युझरने याबाबत तक्रार केलीय. मंत्री आश्विन वैष्णव आणि आयआरसीटीसीला टॅग करत मिश्रा यांनी संकेतस्थळ चालत नसल्याची तक्रार केली. नक्कीच यात काहीतरी घोटाळा सुरु असल्याची शंका त्यांनी उपस्थित करत, संकेतस्थळ सुरु होईल तेव्हा सर्व तिकिटांची विक्री झालेली असेल, असेही मिश्रांनी म्हटले आहे.

IRCTC Down: रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग खोळंबले; आयआरसीटीसीचे संकेतस्थळ, मोबाईल App ठप्प
Vayangani Farming: वायंगण भातलागवड? नको रे बाबा! 50 टक्क्यांहून अधिक शेतजमीन पडीक राहण्याचा धोका

रेल्वेची तात्काळ तिकिट सुविधा काम करत नसल्याची तक्रार आणखी एका युझरने केली आहे. रेल्वेचे रेल कनेक्ट, IRCTC नेक्स्ट जनरेशन ई-तिकिटींग सुविधा काम करत नसल्याची तक्रार अनेक रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

'एका युझरने IRCTC संकेतस्थळच चालवा तुम्ही बुलेट ट्रेन राहुद्यात', अशी संतप्त प्रतिक्रिया दुसऱ्या एका युझरने दिली आहे.

IRCTC Down: रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग खोळंबले; आयआरसीटीसीचे संकेतस्थळ, मोबाईल App ठप्प
Arambol: विदेशी पर्यटकांमुळे स्‍थानिक टॅक्सीचालकांचा व्‍यवसाय धोक्यात! किनारी भागातील वाढता प्रकार

दरम्यान, गेल्या दोन ते अडिच तासांपासून IRCTC रेल्वेच्या तिकिट बुकिंगसाठी अडचण येत आहे. संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही डाऊन असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत रेल्वेकडून किंवा IRCTC कडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. वर्षाअखेर आणि सुट्टीचा कालावधी सुरु असल्याने अनेकजण विविध ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला पसंती देत आहेत. पण, ऐनवेळी तिकिट बुकिंग बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com