IRCTC Data Monetization: प्रवाशांचा डेटा विकून 1000 कोटी कमावण्याच्या तयारीत रेल्वे

IRCTC Data Monetisation Tender: भारतीय रेल्वे आता तुमच्या डेटामधून मोठी कमाई करणार आहे.
Train
TrainDainik Gomantak
Published on
Updated on

IRCTC Data Monetisation Tender: भारतीय रेल्वे आता तुमच्या डेटामधून मोठी कमाई करणार आहे. वास्तविक, यासाठी भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने तुमचा पर्सनल डेटा विकण्याची तयारी सुरु केली आहे. एवढेच नाही तर IRCTC तुमच्या डेटामधून 1000 कोटी कमावण्याची योजना आखत आहे.

डेटा गोपनीयतेची काळजी घेतली जाईल

याबाबत माहिती देताना इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनने सांगितले की, 'सध्या सुरु असलेल्या या निविदेत असे म्हटले आहे की, IRCTC एक सल्लागार नियुक्त करेल, जो त्यांना युजर्सच्या डेटाबद्दल माहिती देईल. ग्राहकांच्या डेटा गोपनीयतेचीही काळजी घेतली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Train
IRCTC Tatkal Booking: तत्काळ तिकीट बुक करतांना या गोष्टी ठेवा लक्षात

वास्तविक, भारतीय रेल्वेची (Indian Railways) बहुतेक तिकिटे फक्त IRCTC द्वारे बुक केली जातात. जवळपास सर्वच लोक ऑनलाइन तिकिटांसाठी IRCTC चा वापर करतात. त्यानुसार सध्या कंपनीच्या वेबसाइटवर युजर्सचा डिजिटल डेटा मोठ्या प्रमाणात आहे. आता या डेटाचा वापर करुन कंपनी 1000 कोटी रुपये कमावणार आहे.

Train
IRCTC च्या नियमांमध्ये बदल, एकाच खात्यावरून करता येणार 24 तिकिटांच बुकिंग

बँकिंग डेटा सुरक्षित राहील

या अंतर्गत Traveling Pattern, History, आणि location संबंधित डेटा IRCTC द्वारे शेअर केला जाईल. परंतु युजर्संना याची काळजी करण्याची गरज नाही, कारण असे करत असताना आयटी कायद्यानुसार यूजर्सची बँकिंग प्रायव्हसी शेअर केली जाणार नाही. म्हणजेच, तुमच्या डेटाच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल. डेटा कमाई अंतर्गत, वापरकर्त्यांचा बँक डेटा अजिबात शेअर केला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com