RBI कडून SBI वर कारवाईचा बडगा

RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला 1 कोटी रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
RBI Fines SBI rupees 1 crore for violation of RBI guidelines
RBI Fines SBI rupees 1 crore for violation of RBI guidelinesDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) विविध मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला 1 कोटी रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला (Standard Charted Bank) 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एसबीआयच्या ग्राहक खात्याची छाननी केली असता असे आढळून आले की बँकेने त्या खात्यातील फसवणुकीची माहिती देण्यात विलंब केला आहे. (RBI Fines SBI rupees 1 crore for violation of RBI guidelines)

RBI ने या संदर्भात SBI ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती . बँकेकडून उत्तर मिळाल्यानंतर मध्यवर्ती बँकेने एसबीआयला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे . आरबीआयने या बाबतीत स्पष्ट केले आहे की , भारतीय रिझर्व्ह बँक फसवणूक-वर्गीकरण आणि व्यावसायिक बँकांद्वारे अहवाल आणि निवडक वित्तीय संस्था निर्देश, 2016 मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एसबीआयवर दंड आकारण्यात आला आहे.

RBI ने जारी केलेले 'ग्राहक संरक्षण - अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांचे मर्यादित दायित्व, बँकांमध्ये सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, बँकांचे क्रेडिट कार्ड ऑपरेशन्स आणि बँकांद्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये आचारसंहिता,या साऱ्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा आर्थिक दंड बँकिंग नियमन अधिनियम, 1949 अंतर्गत आरबीआयकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून लावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com