Indian Railways: रेल्वेने बदलले तिकीट बुकिंगचे नियम, प्रवासापूर्वी जाणून घ्या; अन्यथा...

Indian Railways Rules: तुम्हीही ट्रेन प्रवासाला प्राधान्य देत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak

IRCTC Ticket Booking Rules: तुम्हीही रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आजकाल बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुक करतात, अशा परिस्थितीत बदललेल्या नियमांबद्दल जागरुक असणे आपल्यासाठी आवश्यक आहे. वास्तविक, आयआरसीटीसीने अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे तिकीट बुक करण्याचे नियम बदलले आहेत. रेल्वेने बदललेल्या नियमांनुसार तिकीट बुकिंगसाठी तुम्हाला तुमचे अकाऊंट व्हेरिफाय करावे लागेल.

मोबाईल आणि ईमेल आयडीची पडताळणी आवश्यक

आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, आता युजर्संना ऑनलाइन तिकीट बुक करण्यापूर्वी मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीची पडताळणी करणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरची पडताळणी केल्याशिवाय तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करु शकणार नाही.

Indian Railway
Indian Railway: रेल्वेने दिला Zor Ka Jhatka! या गाड्यांचे वाढले भाडे, लगेच पाहा नवी यादी

वास्तविक, लाखो IRCTC अकाऊंट आहेत, ज्यांनी कोरोना काळापासून ऑनलाइन तिकिटे बुक केलेली नाहीत. जर तुम्ही खूप दिवसांपासून ऑनलाईन तिकीट बुक केले नसेल तर तुम्हालाही हा नियम लागू होईल. आता तिकीट बुक करण्यासाठी, तुम्हाला आधी व्हेरिफिकेशन करावे लागेल. जाणून घेऊया त्याची प्रक्रिया...

Indian Railway
Indian Railway: दिवाळीपूर्वी मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट, वाचा एका क्लिकवर

मोबाईल आणि ई-मेल पडताळणी कशी करावी

IRCTC च्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवर जा आणि व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा. आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी इथे टाका. दोन्ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर, व्हेरिफाय बटणावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर, तुमच्या मोबाइलवर OTP येईल, तो प्रविष्ट करा आणि मोबाइल नंबर व्हेरिफाय करा. ई-मेल आयडीवर मिळालेला कोड टाकल्यानंतर तुमच्या मेल आयडीची पडताळणी केली जाईल.

एका खात्यातून 24 तिकिटे बुक केली जातील

अलीकडेच, रेल्वेने IRCTC खात्याच्या एका यूजर आयडीवर एका महिन्यात बुक केलेल्या तिकिटांची कमाल संख्या 12 वरुन 24 पर्यंत वाढवली आहे. आधार लिंक केलेल्या यूजर आयडीने तुम्ही दर महिन्याला 24 तिकिटे बुक करु शकता. यापूर्वी ही संख्या 12 होती. जर तुमच्या खात्याशी आधार लिंक नसेल तर तुम्ही 12 तिकिटे बुक करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com