
Budget 5G smartphone 2025: इन्फिनिक्सने त्यांच्या बजेट हॉट सिरीजमधील नवीन इन्फिनिक्स हॉट 60 5जी+ स्मार्टफोन मोबाईलप्रेमींसाठी लॉन्च केला. 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च झालेल्या या नवीन 5जी फोनमध्ये वन टॅप एआय बटण, नेटवर्कशिवाय कॉल आणि एआय (AI) सर्कल टू सर्च अशा खास फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. चला तर मग हा फोन खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? सेल कधी सुरु होणार? हा फोन कोणत्या फीचर्ससह लॉन्च करण्यात आला? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...
दरम्यान, या इन्फिनिक्स स्मार्टफोनचा (Smartphone) एकच व्हेरिएंट लॉन्च करण्यात आला आहे, ज्याची किंमत 10,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे, या किमतीत तुम्हाला 6 जीबी/128 जीबी व्हेरिएंट मिळेल. तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च झालेल्या या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 17 जुलैपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
या प्राइज रेंजमध्ये हा इन्फिनिक्स ब्रँड फोन लावा स्टॉर्म प्ले (किंमत 9999 रुपये), आयक्यूओ झेड10 लाइट (किंमत 10998 रुपये) आणि पोको एम7 (किंमत 9299 रुपये) शी स्पर्धा करेल.
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.7 इंचाचा एचडी प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
चिपसेट: इन्फिनिक्स हॉट 60 5जी प्लसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7020 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, जो ड्युअल मोड व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.
बॅटरी: या फोनमध्ये 5200 एमएएचची शक्तिशाली बॅटरी आहे, जी बायपास आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
तसेच, हा फोन अल्ट्रालिंक कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतो, या फीचरचा फायदा असा आहे की, तुम्ही नेटवर्क नसलेल्या किंवा कमी नेटवर्क असलेल्या भागातही सहजपणे कॉल करु शकाल, परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे फीचर फक्त इन्फिनिक्स ते इन्फिनिक्स स्मार्टफोन दरम्यान काम करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.