OYO Rules 2023: मित्र-मैत्रिणीला ओयोमध्ये घेऊन जाताना घ्या ही काळजी, वाचा नवे नियम

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत OYO ला जात असाल, तर आधी सुरक्षिततेबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळा तुम्ही कमी पैसे देण्याच्या लालसेने OYO बुक करता, जिथे तुम्हाला सुरक्षेबाबत खूप धोका असू शकतो.
New OYO Rules
New OYO RulesDainik Gomantak
Published on
Updated on

New Rules Of Oyo Hotel Rooms For Couples For 2023

आजकाल OYO हॉटेल सतत चर्चेत असते. या हॉटेलमध्ये ज्यांना प्रायव्हसी लागते ते प्रत्येक जोडपे आपल्या जोडीदाराला भेटायला जातात. जर तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला OYO हॉटेलमध्ये घेऊन जात असाल, तर तुमच्यासाठी काही नियमांची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अलीकडेच या ब्रँडने त्यांचे काही नियम बदलले आहेत. OYO चे नवीन नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

OYO हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येकजण विचार करतो की आपल्यासाठी कोणते हॉटेल योग्य असेल? तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत OYO ला जात असाल, तर आधी सुरक्षिततेबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळा तुम्ही कमी पैसे देण्याच्या लालसेने OYO बुक करता, जिथे तुम्हाला सुरक्षेबाबत खूप धोका असू शकतो.

OYO हॉटेल कसे बुक करावे?

अविवाहित जोडप्यांना परवानगी देणारे OYO बुक करण्यासाठी, कोणत्याही शहरातील हॉटेल्स शोधताना फिल्टरमध्ये फक्त "OYO वेलकम कपल" हा पर्याय निवडा.

तुम्ही OYO अॅपमध्ये रिलेशनशिप मोड देखील एक्टिव्हेट करू शकता यामुळे, तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. जर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल. तुमची काही तक्रार असल्यास, तुम्ही हेल्पलाइन 9313931393 वर संपर्क साधू शकता किंवा help.oyorooms.com वर ईमेल पाठवू शकता.

OYO चे नियम

आता जोडप्यांना हॉटेलमध्ये राहणे पूर्णपणे कायदेशीर झाले आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण मिळते. “कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणालाही दुसऱ्या व्यक्तीचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही.

New OYO Rules
Goa Petrol Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे; जाणून घ्या आजचे ताजे दर

मैत्रिणीला OYO हॉटेलमध्ये नेणे सुरक्षित आहे का?

भारतीय संविधानातील कलम 21 प्रत्येकाला दोन अधिकारांच्या संरक्षणाची हमी देते, एक जगण्याचा अधिकार आणि दसरा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार.

या सर्व नियमांमुळे प्रत्येकजण आपल्या मैत्रिणीला तसेच मित्रालाही ओयोमध्ये नेणे सुरक्षित आहे.

New OYO Rules
7th Pay Commission: DA आधी प्रमोशनसंबंधी खूशखबर, केंद्र सरकारने बदलले नियम; नोटिफिकेशन जारी

अविवाहीतांसाठी OYO सुरक्षित आहे का?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखाद्या जोडप्याने लग्न केले नसले तरी ते हॉटेलमध्ये जाऊन राहू शकतात. कायद्याने त्यांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे असे लोक या नियमाचा हवाला देऊन आणि स्वतःला लिव्ह-इन पार्टनर म्हणवून हॉटेलमध्ये सहज खोली मिळवू शकतात. त्यांनी असे केल्यास कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे पोलिसही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com