आयफोन चाहत्यांच्या पदरी निराशा! iPhone 15 Pro Max चे लॉन्चिंग लांबणीवर

याबरोबरच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्यात Apple आता सर्व फोन्समध्ये 48 मेगापिक्सेल सेन्सर वापरणार आहे.
iPhone 15 Pro Max launch delay
iPhone 15 Pro Max launch delayDainik Gomantak

iPhone 15 Pro Max launch delayed by 4 weeks:

Apple कंपनीने येत्या 12 सप्टेंबरला iPhone 15 सिरीजच्या लाँच इव्हेंटचे आयोजन केले आहे. या बहुप्रतीक्षित Apple iPhone 15 सिरीज लॉन्च होण्यास आता फक्त एक आठवडा राहिला आहे. असात आयफोन चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 15 Pro Max च्या शिपमेंटसाठी जवळपास चार आठवडे उशीर होण्याची शक्यता आहे.

Apple कंपनी वॉच सिरीज 9 आणि अपग्रेडेड Apple Watch अल्ट्रा सोबत iPhone 15 सिरीजमधील चार फोन्स लॉन्च करणार आहे.

इमेज सेन्सरच्या निर्मितीशी संबंधित उत्पादन समस्या आल्याने iPhone 15 Pro Max चे लॉन्चिंग अंदाजे चार आठवड्यांपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

यामुळे iPhone 15 Pro Max घेण्यासाठी कित्येक दिवसांपासून वाट पाहणाऱ्यांना या फोन साठी आता आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

iPhone 15 Pro Max launch delay
Viral Video: वर्णद्वेषाचा आरोप; नेदरलँड्समध्ये भारतीय तरुणीला आफ्रिकन महिलांकडून मारहाण

यापूर्वी काही अहवालांद्वारे देखील iPhone 15 Pro Max च्या लॉन्चसाठी विलंब होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

Apple चे पुरवठादार, सोनी अपुऱ्या उत्पादन क्षमतेचा सामना करत आहे. 48 मेगापिक्सेल सेन्सर्सच्या वाढत्या मागणीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

याबरोबरत आता आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्यात Apple आता सर्व फोन्समध्ये 48 मेगापिक्सेल सेन्सर वापरणार आहे. जे आधी फक्त iPhone 14 Pro मॉडेल्ससाठीच वापरले जात होते.

iPhone 15 Pro Max launch delay
आता WhatsApp मध्येही तुम्ही वापरू शकता ChatGPT, फॉलो करा या सोप्या टीप्स

iPhone 15 Pro Max विशेष काय?

iPhone 15 Pro Max मध्ये 4,852mAh बॅटरी वापरली जाणार आहे. यासह फोनमध्ये Bionic A17 चिपसेटही असेल. कंपनीने या फोनला iOS 17 सॉफ्टवेअरने सुसज्ज करण्याचे ठरवले आहे.

iPhone 15 Pro Max मध्ये ग्राहकांना जुन्या मॉडेलच्या तुलनेत खूपच कमी बेझल्स पाहायला मिळतील. यासह, त्याच आकाराचा एक मोठा डिस्प्ले असणार आहे.

आयफोनमध्ये टाईप सी यूएसबी पोर्टबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. पत यंदा कंपनीने आयफोन 15 सिरीजमध्ये टाइप सी यूएसबी पोर्ट दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com