Viral Video: वर्णद्वेषाचा आरोप; नेदरलँड्समध्ये भारतीय तरुणीला आफ्रिकन महिलांकडून मारहाण

Netherlands: यावेळी आफ्रिकन महिला अत्यंत चिडलेली दिसली आणि तिने काही कळायच्या आत भारतीय तरुणीला मारायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्यासोबत इतर महिलांनीही भारतीय तरुणीला मारहाण केली.
Indian Girl Beaten By Group Of African Women In Netherlands.
Indian Girl Beaten By Group Of African Women In Netherlands.Dainik Gomantak

Indian Girl Beaten By African Women In Netherlands Over Accusations Of Racism:

नेदरलँड्समध्ये कथित वर्णद्वेषी टिप्पणीवरून एका भारतीय तरुणीला आफ्रिकन महिलांच्या एका गटाने क्रूरपणे मारहाण केली, परंतु या मारहाणीमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

व्हिडीओमध्ये दोघींमधील वादाचे रूपांतर मारहाणीत होण्यापूर्वी, आफ्रिकन महिला अत्यंत चिडलेली दिसली आणि तिने काही कळायच्या आत भारतीय तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच तेथे उपस्थित असलेल्या आफ्रिकन महिलांनीही या भारतीय तरुणीला मारायला सुरू केले.

याहूनही वाईट गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये इतर अनेकजण दिसत आहेत. पण यापैकी कोणीही आफ्रिकन महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी, त्यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर संपूर्ण मारहाणीचे चित्रीकरण केले आणि काही जण तर आफ्रिकन महिलांना घोषणा देत प्रोत्साहन देताना दिसले.

'घर के कलेश' (क्लेश) नावाच्या ट्विटर हॅंडलने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. "एक आफ्रिकन तरुणी वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप करत भारतीय तरुणीला मारहाण करत आहे." असे हा व्हिडिओ शेअर करताना लिहले आहे.

यावेळी प्रदीप नावाद्या यूजरने हे ट्विट रिट्विट करत, "जर भारतीय तरुणीने वर्णद्वेषी टिप्पणी केली असेल तर तिच्यासोबत आफ्रिकन महिलांनी जे केले ते योग्यच आहे. सर्वसाधारणपणे जगभर भारतीय लोक सर्वाधिक वर्णद्वेषी आहेत."! असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com