Manish Jadhav
टाटा मोटर्सने शुक्रवारी (27 जून) हॅरियर ईव्हीचे टॉप मॉडेल लॉन्च केले. या शानदार मॉडेलचे बुकिंग पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे.
टाटा मोटर्सने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही हॅरियर ईव्हीच्या क्यूडब्ल्यूडी (All Vehicle Drive) प्रकाराची किंमत देखील जाहीर केली. या मॉडेलची सुरुवातीची किंमत 28.99 लाख एक्स-शोरुम असेल. हे हॅरियर ईव्हीचे टॉप मॉडेल आहे.
यापूर्वी, कंपनीने ईव्हीच्या आरडब्ल्यूडी प्रकाराची किंमत जाहीर केली होती, ज्याची सुरुवात 21.49 लाख पासून झाली होती. ही एसयूव्ही भारतात महिंद्रा एक्सईव्ही 9ई, बीवायडी अॅटो 3 आणि ह्युंदाई आयोनिक 5 सारख्या कारशी स्पर्धा करते.
हॅरियर ईव्ही पाच कलरमध्ये उपलब्ध आहे. यात नॉक्टर्नल, एम्पॉवर्ड ऑक्साईड, प्युअर ग्रे, प्रिस्टाइन व्हाइट आणि स्पेशल ब्लॅक स्टेल्थ एडिशनचा पर्याय आहे.
हॅरियर ईव्हीचे बाहेरील डिझाइन डिझेल हॅरियरसारखीच आहे, परंतु ईव्हीनुसार त्यात काही बदल करण्यात आले आहेत.
हॅरियर ईव्ही ही टाटाच्या नवीन अॅक्टी.ईव्ही प्लस तंत्रज्ञानावर बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये आहेत. टाटाची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे, ज्यामध्ये AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) सिस्टिम आहे.
हॅरियर ईव्ही दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 65 kWh बॅटरी पॅकसह लोअर व्हेरिएंट आहे. ज्यामध्ये 538 किमीची रेंज उपलब्ध आहे. तसेच, 75 kWh बॅटरी पॅकसह हाय व्हेरिएंट आहे, जो 627 किमीची रेंज देतो.