दमदार फीचर्ससह Infinix GT 30 Pro लॉन्च, Realme-Motorola चं वाढलं टेन्शन!

Infinix GT 30 Pro Launch: इन्फिनिक्सने भारतीय मार्केटमध्ये मोठा धमाका केला. मोबाईलप्रेमींसाठी इन्फिनिक्सने मिड-रेंज सेगमेंटमध्ये GT20 Pro चे अपग्रेडेड व्हर्जन Infinix GT 30 Pro लॉन्च केले.
Infinix GT 30 Pro Launch
Infinix GT 30 Pro LaunchDainik Gomantak
Published on
Updated on

इन्फिनिक्सने भारतीय मार्केटमध्ये मोठा धमाका केला. मोबाईलप्रेमींसाठी इन्फिनिक्सने मिड-रेंज सेगमेंटमध्ये GT20 Pro चे अपग्रेडेड व्हर्जन Infinix GT 30 Pro लॉन्च केले. या धमाकेदार फोनबद्दल बोलायचे झाल्यास, गेमिंग फोकस्ड या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले, मागील बाजूस लाइटिंग, गेमिंग दरम्यान मदतीसाठी शील्ड ट्रिगर बटण, व्हेपर चेंबर कूलिंग आणि बायपास चार्जिंग देण्यात आले आहे. चला तर मग हा हँडसेट खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील आणि या फोनमध्ये तुम्हाला कोणते खास फीचर्स मिळतील? ते जाणून घेऊया....

Infinix GT 30 Pro 5G Specifications

डिस्प्ले: 4500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 144 हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट सारख्या फीचर्ससह या गेमिंग फोनमध्ये 6.87 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 1.5K रिझोल्यूशनसह येतो. तसेच, स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i वापरला आहे.

प्रोसेसर: या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी डी8350 चिपसेट वापरण्यात आली आहे.

बॅटरी: 30 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट असलेल्या या क्लासिक फोनमध्ये 5500 एमएएचची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेरा: मागील बाजूस 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. त्याचवेळी, फोनच्या समोर 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेरा 60 एफपीएसवर 4 के व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असून पुढील कॅमेरा 30 एफपीएसवर 4 के व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.

Infinix GT 30 Pro Launch
Tata Altroz: टाटा करणार मोठा धमाका! 2 CNG सिलेंडरसह लॉन्च करणार शानदार कार; स्विफ्ट आणि ब्रेझाला देणार टक्कर

Infinix GT 30 Pro 5G Price in India

दरम्यान, या नवीन Infinix स्मार्टफोनच्या (Smartphone) 8 GB / 256 GB व्हेरिएंटची किंमत 24999 रुपये असून 12 GB / 256 GB च्या टॉप व्हेरिएंटची किंमत 26999 रुपये आहे. लॉन्च ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर 8 GB व्हेरिएंटची किंमत 22999 रुपये आणि 12 GB व्हेरिएंटची किंमत 24999 रुपये असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसची विक्री ग्राहकांसाठी Flipkart वर 12 जूनपासून सुरु होईल.

Infinix GT 30 Pro Launch
Tata Punch: नेक्सॉनपेक्षा 2 लाखांनी स्वस्त असणारी 'टाटा पंच' बनली नंबर 1, ब्रेझालाही सोडले मागे; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् बरचं काही

स्पर्धा

Infinix ब्रँडचा हा नवीन स्मार्टफोन Realme P3 Ultra आणि Motorola Edge 60 Pro सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल, हे दोन्ही हँडसेट MediaTek Dimensity D8350 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com