Tata समूहाच्या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सरसावले; टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिलं पत्र

नितिन गडकरी या प्रकल्पासाठी सुरूवातीपासून यासाठी आग्रही होते.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Dainik Gomantak
Published on
Updated on

नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. वेदांता- फॉक्सकॉन नंतर C-295 प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. दरम्यान, टाटा समूहाच्या प्रकल्पासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी सरसावले आहेत. नितिन गडकरी यांनी टाटा समूहाचा प्रकल्प नागपुरमध्ये व्हावा यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना पत्र लिहिलं आहे. नितिन गडकरी (Nitin Gadkari) सुरूवातीपासून यासाठी आग्रही होते.

Nitin Gadkari
Police Bharti: महाराष्ट्रात पोलीस 'महा'भरती ! 14,956 पदांसाठी एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रिया

'टाटा समुहाच्या विविध उद्योग आणि व्यापाराच्या अनुषंगाने नागपूरच्या मिहानमध्ये एसईझेड आणि नॉन एसईझेड अशा दोन्ही प्रकारचे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या विविध उद्योगांसाठी मोठे गोदाम या ठिकाणी तयार करता येणार आहे.' असे नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे गडकरी यांनी पत्रात कुठेही एअरबस सोबत टाटाच्या प्रकल्पाबद्दल भाष्य केलेले नाही.

Nitin Gadkari
Maharashtra News: मुंबईतील गिरगाव परिसरात एका गोदामाला भीषण आग, 14 गाड्या जळून खाक

दरम्यान, टाटा एअरबस प्रकल्प (Tata Air Bus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून, शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com