Indigo Airline: इंडिगो एअरलाईन आणि कोईम्बतूर विमानतळाने जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. इंडिगो एअरलाईन आणि कोईम्बतूर विमानतळ यांना जगातील 20 सर्वात समयबद्ध विमानसेवा आणि विमानतळांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म OAG च्या अहवालानुसार, 2022 मध्ये ऑन-टाइम परफॉर्मन्स (OTP) नुसार, इंडिगो 15 व्या स्थानावर आहे तर कोईम्बतूर विमानतळ (Coimbatore Airport) 13 व्या स्थानावर आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, या दोन्ही सूचींमध्ये एकमेव भारतीय विमान कंपनी आणि विमानतळ आहेत.
दरम्यान, ओएजी लीगचा अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला. अहवालात असे नमूद केले आहे की, जागतिक स्तरावर 20 सर्वात समयबध्द विमान कंपन्यांमध्ये, इंडिगो 2022 मध्ये 83.51% च्या OTP सह 15 व्या क्रमांकावर आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो आणि सार्वजनिक क्षेत्रातील कोईम्बतूर विमानतळ जागतिक स्तरावरील शीर्ष 20 समयबध्द विमानसेवा आणि विमानतळांमध्ये स्थान मिळवले आहे.
एव्हिएशन फर्म OAG च्या अहवालानुसार, इंडिगो 2022 मध्ये समयबध्दतेच्या बाबतीत 15 व्या क्रमांकावर आहे, तर कोईम्बतूर विमानतळ 13 व्या क्रमांकावर आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या OAG अहवालात इंडिगो ही एकमेव भारतीय विमान कंपनी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या मालकीचे कोइम्बतूर विमानतळ हे एकमेव भारतीय विमानतळ आहे.
तसेच, इंडिगो 2022 मध्ये जागतिक स्तरावर 20 सर्वात वक्तशीर विमान कंपन्यांमध्ये 15 व्या क्रमांकावर आहे. एअरलाईन 2019 मध्ये 54 व्या क्रमांकावर होती. यादीत पहिल्या क्रमांकावर गरुड इंडोनेशिया (Indonesia) आहे, त्यानंतर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर Saffire आणि Eurowings आहेत.
त्याचप्रमाणे, अव्वल वक्तशीर विमानतळांमध्ये कोईम्बतूर विमानतळाला 13 वे स्थान मिळाले आहे. या यादीत जपानच्या (Japan) ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला क्रमांक लागतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.