दिवाळीपूर्वी करोडो प्रवाशांना मोठी भेट, आता चालत्या Train मध्येही मिळणार कन्फर्म सीट

Indian Railway: ट्रेनमधील प्रवाशांना प्रतीक्षा करण्यासाठी किंवा आरएसी तिकीट कन्फर्म करण्यासाठी टीटीईच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Railways Latest News: देशातील करोडो प्रवाशांना रेल्वेने मोठी भेट दिली आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर आतापासून तुम्हाला चालत्या ट्रेनमध्येही कन्फर्म सीट मिळेल, म्हणजेच आतापासून तुम्हाला ट्रेनमध्ये सीटची चिंता करावी लागणार नाही. रेल्वेच्या या निर्णयामुळे, चालत्या ट्रेनमधील प्रवाशांना प्रतीक्षा करण्यासाठी किंवा आरएसी तिकीट कन्फर्म करण्यासाठी टीटीईच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

7000 प्रवाशांना पक्की जागा मिळाली

रेल्वेने एक विशेष सुविधा सुरु केली असून, त्याला 'हँड-हेल्ड टर्मिनल' (HHT Device) असे नाव देण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत, रेल्वेने गेल्या 4 महिन्यांत दररोज 7000 वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना कन्फर्म सीटची सुविधा दिली आहे, म्हणजेच आतापासून तुम्हाला ट्रेनमध्ये (Train) अगदी काही मिनिटांत कन्फर्म सीट मिळणार आहे.

Indian Railway
Indian Railways: ट्रेनमध्ये आता WhatsApp द्वारे Order करु शकाल तुमच्या आवडीचे जेवण

कन्फर्म सीट कशी मिळवायची?

जर आरक्षित तिकीट असलेल्या कोणत्याही प्रवाशाने (Passengers) शेवटच्या क्षणी त्याचा/तिचे तिकीट रद्द केले किंवा पोहोचला नाही तर ती रिक्त जागा HHT यंत्रणेद्वारे दुसऱ्या प्रवाशाला उपलब्ध करुन दिले जाते, जी TTE प्रतीक्षा यादी असलेल्या प्रवाशाला मिळते.

HHT कसे कार्य करते?

रेल्वेने सादर केलेली HHT डिव्हाइस ही एक विशेष सुविधा आहे. प्री-लोडेड पॅसेंजर आरक्षण चार्टसह हा आयपॅडचा आकार आहे. या चार्टला रिअल टाइम अपडेट्स मिळतात, ज्याद्वारे टीटीईला सर्व सीट्सबद्दल अपडेट केले जाते. आणि त्यानंतर वेटिंग किंवा आरएसी असलेल्या प्रवाशांना सीट मिळते. तसेच, त्याचे अपडेट पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमच्या सेंट्रल सर्व्हरशी जोडलेले असल्याने त्याद्वारे मिळणारे अपडेट परिपूर्ण आहे.

Indian Railway
Indian Railway: गणपती उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी विशेष 214 रेल्वे गाड्यांची सोय

पीटीआयने ही आकडेवारी जाहीर केली

पीटीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही योजना 4 महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत, सुमारे 1,390 ट्रेनचे TTE त्यांच्या प्रवासाच्या विविध टप्प्यांवर किंवा त्यांच्या प्रवासाच्या काही भागांमध्ये दररोज सुमारे 10,745 HHT घेऊन जात आहेत. गेल्या चार महिन्यांत सरासरी 5,448 RAC प्रवासी आणि 2,759 प्रतीक्षा-सूचीत असलेल्या प्रवाशांना HHT द्वारे दररोज जागा वाटप करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com