Indian Railway Rules सावधान! ट्रेनमध्ये तुम्हाला होऊ शकतो दंड

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
Indian Railway Rules
Indian Railway RulesDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Railway Rules: करोडो प्रवासी दररोज भारतीय रेल्वेच्या सेवांचा लाभ घेतात. भारतीय रेल्वेद्वारे दररोज अनेक लोकांना त्यांच्या ठीकाणी नेले जाते. अशा परिस्थितीत संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रेल्वेने काही खास नियम केले आहेत.

Indian Railway Rules
Confirm Ticket Booking: रक्षाबंधनला घरी जाण्याचा प्लॅन करत आहात? कन्फर्म तिकीट बुक करण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक

तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला याची जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. चला जाणून घेऊया या रेल्वे नियमांबद्दल-

ट्रेनमध्ये रात्री झोपण्याचा नियम काय आहे?

सर्व प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने रात्री झोपण्याचे काही नियम केले आहेत. कोणताही प्रवासी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच त्याच्या बर्थवर झोपू शकतो. सकाळी ६ नंतर, बाकीचे सहप्रवासी खालच्या बर्थच्या प्रवाशाला सीटवरून उठण्यास सांगू शकतात. यासोबतच रात्री मोठ्याने बोलणे आणि गाणी ऐकण्यासही मनाई आहे. असे केल्याने तुम्हाला दंड होऊ शकतो.

TTE यावेळी तिकीट तपासत नाही

रेल्वेच्या नियमांनुसार, टीटीई रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही प्रवाशाचे तिकीट तपासू शकत नाही. प्रवाशांची रात्रीची झोप खराब होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने हा नियम केला आहे.

Indian Railway Rules
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! कमाईपेक्षा खर्च जास्त, ChatGPT दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

किती किलो सामान घेऊन प्रवास करता येईल

भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही एसी फर्स्ट क्लासमध्ये 70 किलोपर्यंतच्या सामानासह प्रवास करू शकता. त्याच वेळी, प्रवासी एसी 2 टायरमध्ये 50 किलो, एसी-3 टायरमध्ये 40 किलो, स्लीपरमध्ये 40 किलो आणि द्वितीय श्रेणीमध्ये 35 किलोपर्यंत सामानासह प्रवास करू शकतात.

प्लॅटफॉर्म तिकिटाद्वारेही तुम्ही प्रवास करू शकता

रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमच्याकडे तिकीट घेण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकता. यानंतर, तुम्ही ताबडतोब TTE शी संपर्क साधावा आणि गंतव्य स्थानकापर्यंत तिकीट मिळवावे. TTE तुमचे तिकीट त्वरित बनवेल आणि तुम्ही सहज प्रवास करू शकाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com