केवळ याच प्रवाशांना मिळणार ट्रेनमध्ये 'तिकीट दरात' सवलत..!

कोविड (Covid) महामारी आणि प्रोटोकॉल लक्षात घेता, प्रवाशांच्या भाड्यात पुन्हा सवलत सुरू केली जाणार नाही.
Indian Railway
Indian Railway Dainik Gomantak
Published on
Updated on

Indian Railway : भारतीय रेल्वे दरामध्ये अद्याप ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतींप्रमाणे इतर प्रवाशांना सवलतीचे तिकीट देणार नाही. रेल्वे (Railway) दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्या प्रमाणे कोविड (Covid) महामारी आणि प्रोटोकॉल लक्षात घेता, प्रवाशांच्या भाड्यात पुन्हा सवलत सुरू केली जाणार नाही. रेल्वे दर कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु या मुद्द्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी केली असली तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

Indian Railway
ओमिक्रॉनचे शेअर बाजारावर सावट; एका दिवसात कोट्यवधींचे नुकसान

सवलतीचे तिकीट कोणाला मिळेल

संसदेत सांगितल्या प्रमाणे, दिव्यांगजनांच्या 4 श्रेणी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणी वगळता इतर कोणत्याही श्रेणीतील तिकिटांवर सवलत दिली जाणार नाही. कोविड महामारीनंतर 20 मार्च 2020 पासून तिकिटावरील सवलत रद्द करण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांना संसदेत विचारणा करण्यात आली होती.

ट्रेन प्रवास सवलत किती असते

  • दिव्यांग

  • द्वितीय श्रेणी, SL, प्रथम श्रेणी, 3AC, AC चेअर कारमध्ये 75% सवलत

  • 1AC आणि 2 AC मध्ये 50%

  • 3AC आणि AC चेअर कारमध्ये 25% (राजधानी/शताब्दी ट्रेन)

  • MST आणि QST मध्ये 50%

  • मूकबधिर प्रवासी : 50% द्वितीय श्रेणी, एसएल, प्रथम श्रेणी

  • MST आणि QST मध्ये 50%

रेल्वेमंत्र्यांनी (Railway Minister) गेल्या महिन्यात भारतीय रेल्वे विशेष गाड्यांचे सेवा कमी करणार असल्याची घोषणा केली होती. यासोबत जुने तिकीट दर लागू होतील. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण त्यांना पूर्वीपेक्षा कमी भाडे द्यावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com