आज भारतीय रेल्वेच्या 217 गाड्या रद्द, पहा एका क्लिकवर वेळापत्रक

रेल्वे रुळांची दुरुस्ती सुरू असल्याने अनेक वेळा गाड्या रद्द कराव्या लागतात.
Train Timetable News
Train Timetable NewsDainik Gomantak
Published on
Updated on

रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी मानलो जाते. दररोज लाखो प्रवासी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीची काळजी घेणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोक मोठ्या संख्येने आपापल्या घरी परतत आहेत. यामुळे गाड्यांची संख्या अचानक वाढली आहे. रेल्वे (Train) रद्द झाल्यास लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्या टाळण्यासाठी, प्रवाशांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी आजच्या रद्द केलेल्या आणि रीशेड्युल केलेल्या गाड्यांची यादी (List) तपासली पाहिजे.रेल्वे गाड्या रद्द करण्याचे किंवा वेळापत्रक बदलण्याचे अनेक करणे असू शकतात. यातील मुख्य कारण म्हणजे रेल्वे रुळाची दुरुस्ती. अनेक वेळा हवामानामुळे गाड्या रद्द केल्या जातात. पण आज गाड्या रद्द करण्यामागे वेगवेगळी करणे आहेत. (Train Timetable News Updates)

* 12 रेल्वेचे वेळापत्रक बदलण्यात आले

भारतीय वेबसाईटनुसार, आज वेगवेगळ्या कारणामुळे 217 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये 00109, 00111,00971, 00979 इत्यादी अनेक गाड्यांचा समावेश आहे. रद्द केलेल्या गाड्यांच्या यादीत मुरादाबातहून धावणाऱ्या 3 गाड्याचा समावेश आहे. त्याचबरोबर अनेक गाड्याही डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत आणि आज रेल्वेने 12 गाड्या रीशेड्युल (Reschedule) केल्या आहेत. रीशेड्युल केलेल्या गाड्यांमध्ये कालका ते शिमला या तीन गाड्यांचा समावेश आहे. जर तुम्हाला रीशेड्युल केलेल्या गाड्यांबद्दल माहिती करून घ्यायचे असे तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर (Website) जावून पाहू शकता.

Train Timetable News
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत? कच्च्या तेलात घसरण झाल्याने...

* रीशेड्युल , रद्द केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक

* रद्द केलेल्या गाड्यांची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in./mntes/या वेबसाइटला भेट द्या.

* नंतर Exceptional Trains पर्याय दिसेल. यावर क्लिक करावे.

* रीशेड्युल किंवा रद्द केलेल्या रेल्वेच्या यादीवर क्लिक करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com