रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, वेगाने वाढणाऱ्या तेलाच्या किमतींनी जगाची चिंता वाढवली आहे. तेलाच्या किमती वर्षांमध्ये प्रथमच प्रति बॅरल $100 च्या वर गेल्या, परंतु WTI कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी पाच टक्क्यांहून अधिक घसरुन $100 प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत. (Are Petrol diesel prices not going up A big drop in crude oil can be a relief)
दरम्यान, एबीएस न्यूजनुसार, खरं तर, चीनच्या (China) अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीबद्दल वाढत्या चिंतेने गुंतवणूकदारांना तेलाच्या मागणीबद्दल पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. तेल बाजारात करार 5.7 टक्क्यांनी घसरुन $97.13 वर आला, तर ब्रेंट सहा टक्क्यांनी घसरुन $100.54 वर बंद झाला. कच्च्या तेलाच्या बाजारातील 14 वर्षांची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तब्बल आठवडाभरानंतर तेलाचे दरात घसरण झाली.
तर दुसरीकडे, ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे चीनने रविवारी टेक्नोलॉजीचे प्रमुख केंद्र असलेल्या शेनझेनमध्ये लॉकडाऊन जाहीर केला. या शहराची लोकसंख्या 1 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये, कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे.
शिवाय, चीन हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. परंतु लॉकडाऊनच्या घोषणेमुळे तेलाच्या मागणीवर परिणाम झाला आहे, तर रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता चर्चेवरही बाजाराच्या आशा आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.