GDP Growth: पुन्हा आर्थिक संकट, देशाच्या GDP वाढीचा वेग मंदावणार!

GDP Growth: जगभरात कोरोना रुग्णांची संख्य पुन्हा वाढू लागली आहे. याचच परिणाम भारतातही दिसून आहे.
GDP
GDPDainik Gomantak
Published on
Updated on

GDP Growth: जगभरात कोरोना रुग्णांची संख्य पुन्हा वाढू लागली आहे. याचच परिणाम भारतातही दिसून आहे. दुसरीकडे, देशाची जीडीपी वाढ मंदावू शकते, असा सरकारचा अंदाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था सात टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी लोकसभेच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी हे आकडे महत्त्वाचे आहेत.

दरम्यान, 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षात भारताचा GDP 8.7% च्या दराने वाढला आहे. या संदर्भात, 2022-23 या आर्थिक वर्षातील जीडीपीच्या आकडेवारीत सुस्तीचा अंदाज आहे. गेल्या महिन्यात, रिझव्‍‌र्ह बँकेने भूराजनीती आणि जागतिक आर्थिक परिस्थिती स्थिर असल्याचा हवाला देत चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाज 7% वरुन 6.8% पर्यंत कमी केला होता.

GDP
RBI Rule: 1 जानेवारीपासून बँकांच्या नियमांत 5 नवीन बदल

दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेने 2022-23 साठी वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.8%, Q3 मध्ये 4.4% आणि Q4 मध्ये 4.2% ठेवला होता. एप्रिलमध्ये, RBI ने त्याचा GDP वाढीचा अंदाज 7.8% वरुन 7.2% पर्यंत कमी केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तो 7% पर्यंत कमी केला होता.

GDP
RBI Monetary Policy: वर्षभरात पाचव्यांदा महागली गृह, वाहन कर्जे; आरबीआयकडून व्याज दरात वाढ

तसेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने देखील जुलै 2022 चा GDP अंदाज 7.4% वरुन 6.8% पर्यंत कमी केला. तथापि, जागतिक बँकेने जीडीपी अंदाज 6.5% च्या आधीच्या अंदाजावरुन 6.9% वर वाढवला. त्याचवेळी, आशियाई विकास बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज 7% वर अपरिवर्तित ठेवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com