Report: भारत होणार नवे इलेक्ट्रॉनिक हब! पाच वर्षांत 250 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढणार उत्पादन

भारताचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन पुढील पाच वर्षांत सुमारे 250 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
India’s Electronic Manufacturing Likely To Reach Around USD 250 Billion in Next Five Year
India’s Electronic Manufacturing Likely To Reach Around USD 250 Billion in Next Five YearDainik Gomantak
Published on
Updated on

India’s Electronic Manufacturing Likely To Reach Around USD 250 Billion in Next Five Year: सध्या भारताला इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र बनवण्याचे स्वप्न झपाट्याने प्रत्यक्षात येत आहे. भारताचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन पुढील पाच वर्षांत सुमारे 250 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या देशाची इलेक्ट्रॉनिक निर्यात 125 ते 130 अब्ज डॉलर्स एवढी आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करुन देशातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचाही सरकारचा मेगा प्लॅन आहे. सध्या या क्षेत्राने 25 लाख लोकांना रोजगार दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार येत्या पाच वर्षांत या क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या दुप्पट करणार आहे. इन्व्हेस्ट इंडियाच्या मते, 5G नेटवर्क आणि IoT (Internet of Things) सारख्या तंत्रज्ञानातील बदलांमुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा अधिक वेगाने अवलंब होत आहे.

India’s Electronic Manufacturing Likely To Reach Around USD 250 Billion in Next Five Year
Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी सारख्या प्रोजेक्टमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या बाजारपेठेत IoT ची मागणी वाढली असून निःसंशयपणे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी नवीन युगाची सुरुवात होईल. सध्या, भारताचे देशांतर्गत उत्पादन 2016-17 या आर्थिक वर्षातील $ 49 अब्ज वरुन 2022-23 आर्थिक वर्षात $ 101 अब्ज पर्यंत वाढले आहे.

इन्व्हेस्ट इंडियाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात $2.65 अब्ज इतकी नोंदवली गेली. एप्रिल 2023 मध्ये ती $2.10 अब्ज होती, म्हणजेच त्यात 25.80 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com