Income Tax News: मोदी सरकारने गेल्या अर्थसंकल्पात अनेक आश्वासने दिली होती, जी सरकारने वर्षभरापूर्वीच पूर्ण केली आहेत. 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने ITR नियमात मोठा बदल केला आहे. आतापासून काही लोकांना आयकर रिटर्न भरावे लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यांसंबधी घोषणा केली आहे.
यापुढे 75 वर्षांवरील अशा ज्येष्ठ नागरिकांना (Citizens) आयकर विवरणपत्र भरावे लागणार नाही, अशी घोषणा अर्थ मंत्रालयाने केली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे फक्त पेन्शन किंवा बँकेचे व्याज आहे, त्यांना आयटीआर भरण्याची गरज नाही. अर्थ मंत्रालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
सरकारने सांगितले आहे की आयकर कायदा, 1961 मध्ये एक नवीन कलम कलम 194P जोडण्यात आले आहे, ज्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळेल.
याबाबत माहिती देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबत अधिसूचना जारी केल्याचे सांगितले. याशिवाय, नियम 31, नियम 31A, फॉर्म 16 आणि 24Q मध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत.
कर सवलतींसाठी मॅन्युफॅक्चरिंग सुरु करण्याची अंतिम तारीख 1 वर्षाने वाढवण्यात आली आहे. आता त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 करण्यात आली आहे. प्राप्तिकर कायदा, नागरिकांच्या उत्पन्नावर कराच्या तरतुदींसह, अनेक सवलती आणि सूट देखील प्रदान करतो. याच सवलतींमुळे करदात्यांनाही मोठा दिलासा मिळतो. हे लक्षात घेऊन 2018 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने (Modi Government) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.