Bank Holidays: सप्टेंबरमध्ये बँका राहणार 16 दिवस बंद, चेक करा लिस्ट

Bank Holidays in September 2023: जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात (September 2023) कामानिमित्त बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Bank Holidays in September 2023
Bank Holidays in September 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Bank Holidays in September 2023: जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात (September 2023) कामानिमित्त बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी अगोदरच जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात 16 दिवस बँकां बंद असणार आहेत, त्यामुळे सुट्ट्यांची यादी पाहूनच तुमच्या कामाचे नियोजन करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या सुट्ट्यांच्या यादीत राज्यांच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला लाँग वीकेंडही लक्षात ठेवावा लागेल.

Bank Holidays in September 2023
Bank Holiday in July: जुलै महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी 'या' तारखा ठेवा लक्षात, बँका राहणार 15 दिवस बंद!

बँक सुट्ट्यांची यादी -

>> 3 सप्टेंबर 2023- रविवार असल्यामुळे या दिवशी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

>> 6 सप्टेंबर 2023- कृष्ण जन्माष्टमीमुळे भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा येथे बँका बंद राहतील.

>> 7 सप्टेंबर 2023- कृष्ण जन्माष्टमीमुळे अहमदाबाद, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, तेलंगणा, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

>> 9 सप्टेंबर 2023- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

>> 10 सप्टेंबर 2023- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

>> 17 सप्टेंबर 2023- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

>> 18 सप्टेंबर 2023- गणेश चतुर्थीमुळे बंगळुरु आणि तेलंगणामध्ये बँका बंद राहतील.

>> 19 सप्टेंबर 2023- गणेश चतुर्थीमुळे अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद राहतील.

>> 20 सप्टेंबर 2023- गणेश चतुर्थी आणि नुआखाईमुळे कोची आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद राहतील.

>> 22 सप्टेंबर 2023- नारायण गुरु समाधी दिनानिमित्त कोची, पणजी आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.

>> 23 सप्टेंबर 2023- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

>> 24 सप्टेंबर 2023- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

>> 25 सप्टेंबर 2023- श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंतीनिमित्त गुवाहाटीमध्ये बँकेला सुट्टी असेल.

>> 27 सप्टेंबर 2023- मिलाद-ए-शरीफमुळे जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.

>> 28 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलादमुळे अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बंगळुरु, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इम्फाळ, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर येथे बँका बंद राहतील.

>> 29 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलाद-उन-नबी, गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

Bank Holidays in September 2023
Bank Holiday in March: 'या' महिन्यात 12 दिवस बॅंक राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

अधिकृत लिंक तपासा

बँक (Bank) सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत लिंकला देखील भेट देऊ शकता https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx. येथे तुम्हाला दर महिन्याला प्रत्येक राज्याच्या बँक सुट्ट्यांची माहिती मिळेल.

Bank Holidays in September 2023
Bank Holidays October 2022: ऑक्टोबरमध्ये बँका राहणार 21 दिवस बंद, फटाफट कामे उरकून घ्या

तुम्ही ऑनलाइन बँकिंगचा लाभ घेऊ शकता

सप्टेंबर महिन्यात सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार असून मोबाईल नेट बँकिंगच्या माध्यमातून लोक घरी बसून आपली कामे करु शकतील अशी सुविधा बँकेने उपलब्ध करुन दिली आहे, परंतु अशा परिस्थितीत एटीएममधून (ATM) पैसे काढताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

म्हणून, सुट्टीपूर्वी रोख रकमेची व्यवस्था करा. सप्टेंबरमध्ये जवळपास 16 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे सुट्ट्यांची यादी पाहूनच तुमचे नियोजन करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com